काळाने घात केला ! आनंदात नाचणाऱ्या काकांच्या क्षणात झाला मृ’त्यू, कॅमेऱ्यात कैद झाला मन हेलावून टाकणारा व्हिडिओ…

काळाने घात केला ! आनंदात नाचणाऱ्या काकांच्या क्षणात झाला मृ’त्यू, कॅमेऱ्यात कैद झाला मन हेलावून टाकणारा व्हिडिओ…

आज इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला रोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतात. रोज सोशल मीडियावर कित्येक व्हिडियोज अपलोड होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडियो वाऱ्याच्या वेगाने सगळीकडेच वायरल होतात.

आपल्याला आलेले अनुभव किंवा समोर आलेले हटके किस्से अनेकजण आपल्या कँमेरात कैद करतात आणि तेच व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यापैकी काही किस्से आपल्याला पोटभरून हसवतात तर काही किस्से आश्चर्याचा मोठा धक्काच देतात. काही व्हिडियोज बघून आपल्याला भावना अनावर होतात.

पार्टी, लग्न सोहळा, यामधील डान्सचे किंवा गाण्याचे तर अनेक व्हिडियो रोज आपल्याला बघायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडियो सगळीकडे वायरल होत आहे. या व्हिडियोने सगळ्यांनाच अवाक केलं आहे. काळ कधी कोणावर आघात करेल याची कोणीच शाश्वती देऊ शकत नाही, हेच या व्हिडियोमध्ये बघायला मिळत आहे.

कोणाचे नि’धन, कधी आणि कशा प्रक्रारे होणार हे खुद्द दैव देखील सांगू शकत नाही, याचीच प्रचिती हा व्हिडियो बघून येत आहे. सदर व्हिडियो एका लग्नातील आहे. लग्न सोहळा असल्यामुळे सहाजिकच सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातवरण या व्हिडियोत पाहायला मिळत आहे. आनंदाच्या भरात सगळेचजण जुन्या गाण्यावर थिरकत असल्याचे दिसत आहे.

या आनंदाच्या वातावरणात एक व्यक्ती दोन महिलांसोबत डान्स करत आहे. बदन पे सितारे लपेटे हुए, हे शशी कपूरच गाणं व्हिडिओ मधून ऐकायला येत आहे. ही व्यक्ती गाण्याचा पुरेपूर आनंद घेत या गाण्यावर अतिशय उत्साहाने डान्स करत आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहे.

या वयात अशाप्रकारे डान्स करत असल्याचं पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वच लोक त्यांना प्रोत्साहित करत आहेत. टाळ्या वाजवून त्या व्यक्तिचे कौतुक देखील करत आहेत. मात्र डान्स करत असतानाच अचानक या व्यक्तीला अत्यंत अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळेच ते डान्स करताना थांबवतात आणि स्टेजवर तिथेच बसतात.

तेवढ्यात त्यांच्यासोबत नाचणाऱ्या महिलांपैकी एक जण त्यांना काय झालं म्हणून त्यांची विचारपूस करायला जाते. काही समजण्याच्या आत, क्षणातच ते स्टेजवर को’सळतात आणि जागच्या जागीच त्यांचा मृ’त्यू झाला असल्याचं समोर येतं. अशाप्रकारे अचानक झालेल्या त्यांच्या नि’धनामुळे कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

लग्नाचे प्रफुल्लित आणि उत्साहाचे वातावरण दुःख आणि शो’काच्या वातावरणात परिवर्तित झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर प्रतीक दुवा नावाच्या एका युजरने त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘मृ’त्यूची काही वेळ नाही,’ अस कॅप्शन देत त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ बघून सर्वजण शॉक झाले आहेत.

अनेकजण या व्हिडिओ वरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यापैकी एक युजर म्हणतो की, ‘मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे इतक्या वयाच्या व्यक्तीच्या हृ’दयावर खूप जास्त वा’ईट परिणाम होतो. या व्यक्तीच्या मृ’त्यूचा कारण देखील मोठ्या आवाजात लावण्यात आलेला गाणं असू शकते.’ लग्नकार्यात सर्वचजण आनंदी असतात. मात्र आपल्या उत्साहात थोडं भान ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा त्याचे भी’षण प’रिणा’म भोगा’वे लागू शकतात हेच या व्हिडियो वरून समजते.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.