‘काय होतीस तू, काय झालीस तू ?’ एकेकाळी बॉलिवूडची सर्वात हॉट समजली जाणारी तनुश्री दत्ताची आज झाली आहे अशी हालत, पाहून चकित व्हाल…

अभिनेत्री ऐश्वर्या राय, सुष्मिता सेन, दिया मिर्झा यांनी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकून बॉलीवूड मध्ये धडाक्यात एंट्री घेतली. यामध्ये त्यांना यश देखील आलं. त्यानंतर अनेक तरुणी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्या.

मधल्या काळात मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर जणू त्या तरुणींसाठी बॉलिवूडची दारं खुली झाली होती. मॉडलिंगच्या क्षेत्रात नाव कमवून अनेकांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक तनुश्री दत्ता देखील आहे. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता ही एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री मानली जायची.

‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देऊन तनुश्रीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. त्यावेळी अनेक जण तनुश्रीसाठी अक्षरशः वेडे झाले होते. तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लुक वर कित्येक जण फिदा झाले होते. पण आज तनुश्रीला पाहून तेच चाहते तिला ओळखतही नाहीत.

तनुश्री अनेक चित्रपटांमध्ये दिसली होती. पण तिने ‘आशिक बनाया आपने’ या गाण्याने भारतात खळबळ उडवून दिली होती. या गाण्यांमध्ये तनुश्रीने बोल्डनेस ची सर्व हद्द पार केली होती. तनुश्री आता मोठ्या पडद्यापासून दूर साधे आयुष्य जगत आहे. आता तिच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे.

तनुश्रीने चित्रपटांपासून दुरावल्यावर ती पूर्णपणे बदलली. बॉलीवूडची ही सुपरफिट हिरोईन वजनदार झाली होती. या स्टाईलमध्ये तनुश्रीला ओळखणे कठीण झाले. तनुश्री पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा ती विमानतळावर दिसली. अभिनेत्रीने निळ्या रंगाचा टॉप आणि नेव्ही ब्लू रंगाचे लेगिंग घातले होते.

वजन वाढल्यामुळे तनुश्री खूप बदलली, ती आता अमेरिकेत राहते. चित्रपटाव्यतिरिक्त तनुश्री नाना पाटेकर यांच्यावरील शो षणाच्या आ रोपांमुळे चर्चेत होती. तनुश्रीला सिनेसृष्टीला अलविदा होऊन बरीच वर्षे झाली आहेत. ‘आशिक बनाया आपने’ व्यतिरिक्त तनुश्री ‘चॉकलेट’, ‘रकीब’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.

पण नंतर एक दिवस अचानक तिने इंडस्ट्रीला अलविदा केला आणि गायब झाली. 2004 ची गोष्ट आहे जेव्हा तिने मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. पण तिची कारकीर्द संपल्यानंतर बॉलिवूडची ही बोल्ड अभिनेत्री आता अनामिक जीवन जगत आहे. तनुश्री खूप छान अभिनेत्री आहे, तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. बॉलिवूडमधील मीटू मोहिमेमुळे ती चर्चेतही होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12