“काय होतीस तू, काय झालीस तू” कधीकाळी हॉटनेस साठी प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीचा झालेला मेकओव्हर पाहून चकित व्हाल…

‘थोडा सा प्यार हुआ है’ हे गाणं आजदेखील खूप रोमँटिक असं आहे. आजही, या गाण्याचे खूप फॅन्स आहेत. हे गाणं जितकं हिट झालं होत, तेवढीच या गाण्यामधील सुंदर अभिनेत्री देखील हिट झाली होती.
सोहेल खान आणि संजय दत्त यांच्या मैने दिल तुझं को दिया या सिनेमामधून, बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी ‘समीरा रेड्डी’ आपल्या पहिल्याच चित्रपटामधून सर्वांच्या पसंतीस उतरली. तिचा सुंदर, सोज्वळ असा चेहरा आणि तेवढाच बोल्ड अंदाज यामुळे काहीच वेळात समीरा रेड्डीचे अनेक चाहते निर्माण झाले.
बॉलीवूडमध्ये एंट्री घेण्याआधी, समीरा एका मोठी आणि प्रसिद्ध मॉडेल होती. पंकज उदास यांच्या ‘और आहिस्ता’ या अल्बम मुळे कमालीची लोकप्रिय झाली होती. मात्र, पहिल्याच सिनेमा नंतर, समीराने दक्षिण चित्रपटसृष्टीमधे देखील चांगलीच चर्चा रंगवली होती. त्यानंतर बॉलीवूड आणि टॉलिवूड सगळीकडेच तिचा प्रचंड चाहता वर्ग निर्माण झाला होता.
त्यानंतर रेस, मुसाफिर या सिनेमामध्ये आपल्या हॉ’ट आणि बो’ल्ड अंदाजाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. मॉडेलिंग आणि सिनेमा अश्या दोन्हीही क्षेत्रांमध्ये समीरा ने यश मिळवली. चांगलीच लोकप्रियता कमवली. त्यानंतर २०१४ मध्ये समीराने, अक्षय वर्दे यांच्यासोबत अगदी मराठमोळी साजात, थाटामाटात लग्न केलं.
त्यानंतर तिला २ मुलं देखील झाले. आपल्या ग’रोद’रपणात तिने काही फोटोज देखील शेअर केले होते. ती सोशल मीडियावर भलतीच ऍक्टिव्ह असते. अनेक वेळा स्किन केअर आणि मेकअप ट्युटोरियल चे व्हिडीओ शेअर करत असते. मात्र त्याचसोबत ती आजदेखील, आपल्या फिटनेसने सध्याच्या नवख्या अभिनेत्रींना देखील कडवी टक्कर देते.
सध्या तिचा एक फोटो सगळीकडेच चांगलीच चर्चा रंगवत आहे. यामध्ये तिने आपला फॅट टु फिट चा प्रवास दाखवला आहे. यामधील पहिल्या फोटोमध्ये तिच्या पोटाचा घेर जरा वाढलेला दिसत असून सोबतच डबल चीन देखील दिसत आहे. मात्र दुसऱ्या फोटोमध्ये, तिचे पोट पूर्ण फ्लॅट दिसत असून तिची डबल चीन देखील गायब झाली हे.
आपल्या या फोटोसोबतच तिने एका भली मोठी पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपला फॅट तो फिट चा प्रवास लिहत काही फिटनेस टिप्स देखील सांगितल्या आहे. याच फिटनेस रुटीन मुळे तिने वजन घटवले आहे. पूर्णपणे साखर कमी आणि सोबतच योग्य आहार यामुळे तिने वजन कमी केले.
समीरा रेड्डी आता पुन्हा चांगलीच, फिट झालेली आढळून आली आहे. तिच्या या फोटोवर लाईक्सचा चांगलाच वर्षाव होत आहे. आपल्या दिनचर्येमध्ये ती बदल होऊ देत नाही आणि कठोर मेहनत घेते. यामुळेच तिला वजन कमी करणे शक्य झाले आहे असे ती सांगते.