काय सांगता ? रेखासोबत लग्न करण्यासाठी वयाच्या ५५व्या वर्षी देखील ‘हा’ अभिनेता आहे अविवाहित

बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून आज देखील रेखा चे नाव सर्वात पहिले येते. आजही रेखा या नावाची जादू कायम आहे. ‘रेखा’ यांचा खूप मोठा चाहतावर्ग होता आणि आज देखील आहे. रेखा या केवळ सर्वसाधारण लोकांच्याच नाही तर, अनेक सेलिब्रिटीजचं देखील ‘ड्रिमगर्ल’ होत्या. त्याबद्दलचाच खुलासा आता अजून एका सुपरस्टार ने केला आहे.
एक असा सुपरस्टार जो अजूनही सिंगल आहे. होय. बॉलीवूडच्या दबंग खान ‘सलमान’ने रेखा साठी असणाऱ्या प्रेमाची साक्ष दिली आहे. संगीता बिजलानीच, सलमान खानचे पहिले प्रेम होती असं आजवर आपल्या सर्वाना माहिती होत. मात्र आता सलमान खानने स्वतः आपल्या पहिल्या प्रेमाचा खुलासा केला आहे. संगीता बिजलानी नव्हे तर, अभिनेत्री रेखा सालमान खानचे पहिले प्रेम होत.
रेखासोबत लग्न करण्याचे स्वप्न सलमान खान बघत होता. यावेळी ‘बिग बॉस’च्या वीकेंडच्या भागात अभिनेत्री रेखा पाहुणी म्हणून आल्या होत्या. विशेष म्हणजे त्यावेळी खुद्द रेखा यांनी हा खुलासा केला. रेखा यांच्या ‘बीवी हो तो ऐसी’ या सिनेमधूनच खऱ्या अर्थाने सलमान खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सिनेमामध्ये सलमानने त्यांच्या दिराची भूमिका साकारली होती.
अनेकांना त्याचे पात्र लक्षात देखील नाहीये. पण सिनेमामध्ये रेखा आणि फारुख शेख सारख्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे म्हणून सलमान खानने त्या सिनेमात छोटेसे पात्र रेखाटले होते. याबद्दलचा खुलासा त्याने स्वतः एका मुलाखतीमध्ये केला होता. आणि त्यात अजून एक खुलासा बिग बॉसच्या मंचावर आता रेखा यांनी केला आहे.
‘सलमान खानचे खूप अफेअर्स होते हे सगळ्यांना माहित होत. मात्र एका खास एकतर्फी प्रेमाबद्दल कोणालाच माहित नाही. रेखा यांच्यावर त्याचे प्रेम होते, आणि त्याच्यासोबतच लग्न करण्याची त्याची इच्छा होती. तो अनेकवेळा रेखाला फॉलो करत असे. त्यांना बघता यावं, आणि त्यांच्या जवळ जात यावं म्हणून त्यानं योगा क्लास देखील जॉईन केला होता. एक दिवस रेखासोबत त्याचा थाटामाटात विवाह होईल, असं स्वप्न तो बघत असे.
म्हणूनच त्याने कोणाशीच लग्न नाही केलं, अजूनही तो सिंगल आहे,’ असा खुलासा रेखा यांनी यावेळी केला. याला उत्तर देत अगदी गमतीशीर पद्धतीने सलमानने देखील त्यावर होकार भरला आणि हसत म्हणाला, ‘रेखा आप ही हो मेरा पेहला पेहला प्यार.’ रेखा आणि खान कुटुंबाचे खास संबंध आहेत. त्याचबरोबर सलमान आणि रेखा दोघेही खूप चांगले मित्र आहेत. सलमान कायमच रेखा यांचा खूप जास्त आदर करतो.