‘कहो ना प्यार हैं ‘ मधील हृतिक रोशनचा तो भाऊ आठवतो का ? पहा झालाय खूपच मोठा की ओळखताही येणार नाही…

बॉलीवूडमधील काही चित्रपट कायम लक्षात राहतात. या चित्रपटांनी मिळवलेलं यश त्यांची खास ओळख आहे. अशा चित्रपटांना प्रदर्शित होऊन कित्येक काळ लोटला असला तरीही त्यांची क्रेझ कायम असते. अशाच काही खास चित्रपटांपैकी एक ‘कहो ना प्यार है’ हा देखील आहे.
२००० सालच्या सुरुवातीलाच हृतिक रोशनचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या चित्रपटाने त्यावेळी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अनेक नवीन विक्रम बनवत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गडगंज कमाई केली.
आजही या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग पाहायला मिळतो. चित्रपटाचे कथानक, संगीत आणि जोडीला कलाकारांचा दमदार अभिनय, यामुळे या सिनेमाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. केवळ चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे हृतिक रोशन आणि अमिषा पटेलच नाही तर सिनेमातील इतर कलाकरांना देखील या चित्रपटाने खास ओळख मिळवून दिली.
अशाच काही कलाकारांपैकी एक हृतिक रोशनच्या छोट्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता देखील आहे. अभिषेक शर्मा या बाल -कलाकाराने हृतिक रोशनच्या भावाची म्हणजेच अमितची भूमिका साकारली होती. नुकतंच कहो ना प्यार है सिनेमाला २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. 14 जानेवारीला 23 वर्षे पूर्ण झाली.
आणि त्या निमित्ताने अभिषेकने हृतिक आणि त्याचे वडील राकेश रोशन यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. या चित्रपटातून आपल्याला संधी दिल्याबद्दल आणि या चित्रपटाशी आपण जोडलो गेल्याबद्दल अभिषेकनं राकेश रोशन आणि ऋतिक रोशनचं आभार मानले आहेत.
त्याचसोबत या चित्रपटाचा भाग असल्याचाही त्यानं आनंद व्यक्त केला आहे. आता अभिषेक शर्मा देखील चांगलाच मोठा झाला आहे. सोशल मीडियावर अभिषेक बऱ्यापैकी सक्रिय असतो. सध्या मनोरंजन सृष्टीमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिषेकची आई मिस इंडिया राहिलेली आहे. त्याची आई नीता शर्मा यांनी लग्न झाल्यानंतर मॉडेलिंगला राम राम ठोकला आणि संसारात रमल्या.
असं असलं तरीही आपल्या मुलाने एका उत्तम अभिनेता व्हावं असं त्यांचं स्वप्न होत. त्यामुळे अभिषेकने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून सिनेमातून काम करण्यास सुरुवात केली. दुष्मन दुनिया का, चॅम्पियन सारख्या चित्रपटामध्ये देखील अभिषेक शर्माने चाईल्ड आर्टिस्टची भूमिका साकारली आहे. आता अभिषेक टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. मिले जब हम तुम सारख्या अनेक मालिकांमध्ये त्यानं काम केलं आहे.