कशी झाली पहिल्या महायुद्धाची सुरूवात ? 106 वर्षांपूर्वीचा तो भयानक इतिहास

पहिल्या महायुद्धाविषयी तुम्ही इतिहासाच्या पुस्तकांत यापूर्वी बरेच काही वाचले असेल. हे युद्ध 1914 ते 1918 पर्यंत लढले गेले. युरोप, आशिया आणि आफ्रिका या तीन खंडांच्या समुद्रात, पृथ्वी आणि आकाशात लढले गेले होते, असले तरी मुख्यतः याला युरोपचे महायुद्ध म्हटले जाते. आता इतर माहिती करून घेण्यापूर्वी या युद्धाला ‘महायुद्ध’ का म्हटले जाते आणि त्याचा जगावर प्रभाव का पडला होता हे आपण माहीत करून घेऊया. वास्तविक, या लढाईत सहभागी झालेले देश, त्यांचा प्रदेश (ज्या प्रदेशात ही लढाई झाली होती) आणि यामुळे झालेल्या नुकसानीमुळे याला ‘महायुद्ध’ असे म्हणतात.
पहिल्या महायुद्धामुळे जवळजवळ निम्म्या जगाला हिंसाचाराचा फटका बसला होता असे मानले जाते आणि यावेळी सुमारे एक कोटी लोक मरण पावले आणि दोन कोटीहून अधिक लोक जखमी झाले. या व्यतिरिक्त रोग आणि कुपोषणामुळे लाखो लोक मरण पावले.
या युद्धाच्या शेवटी, जगातील चार प्रमुख साम्राज्य, जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी (हॅप्सबर्ग) आणि उस्मानिया (तुर्क साम्राज्य) यांचा विनाश झाला होता. यानंतर, युरोपच्या सीमारेषा पुन्हा निश्चित झाल्या आणि त्याच वेळी अमेरिका देखील एक महासत्ता म्हणून दूनियेसमोर उदयास आली.
पहिल्या महायुद्धासाठी कोणतीही एक घटना जबाबदार धरू शकत नाही. ह्या युध्दाला 1914 पर्यंत झालेल्या विविध घटना आणि वेगवेगळी करणे जबाबदार मानली जाऊ शकतात, तथापि, युद्धाच महत्वाचं कारण म्हणजे ऑस्ट्रिया-हंगरी साम्राज्याचा उत्तराधिकारी आर्चडुक फर्डिनेंड आणि त्यांची पत्नी यांची बोस्निया मध्ये हत्या करण्यात आली होती हेच या युद्धाचे कारण असल्याचे समजते. 28 जून 1914 रोजी सर्बियावर आरोप ठेवून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेच्या एक महिन्यानंतर 28 जुलै 1914 रोजी ऑस्ट्रियाने सर्बियावर आक्रमण केले. त्यानंतर ह्या युध्दात अनेक वेगवेगळे अनेक देश सामील झाले होते. आणि अखेर त्याचे रूपांतर विश्व युध्दात झाले.
11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीने अधिकृतपणे शरण गेल्यानंतर हे युद्ध संपले. याच कारणास्तव 11 नोव्हेंबरला पहिल्या महायुद्धाचा शेवटचा दिवसही म्हटले जाते. यानंतर, 28 जून 4919 रोजी जर्मनीने शांती कराराच्या नावाने ओळखल्या जाणार्या व्हर्साय करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे त्यांना त्यांचे जागेचा एक मोठा हिस्सा गमवावा लागला होता. त्याच वेळी, त्यानंतर त्यांचेवर इतर राज्यावर ताबा घेण्यास बंदी घालण्यात आली होती आणि त्याच्या सैन्याचा संख्याही मर्यादित ठेवण्यात आली होती. व्हर्साईल्सचा तह जर्मनीवर सक्तीने लादला गेल्याचा समज फैलावला गेला होता. ह्या कारणामुळे हिटलर आणि जर्मनी चे इतर लोक ह्या कृत्याला अपमान मानत होते आणि असे समजले जाते की हाच अपमान दुसऱ्या विश्व युध्दाचे कारण बनले.