करिना कपूरने ‘तिसऱ्यांदा’ दिली गुडन्यूज ? ‘तिसऱ्या’ मुलाचा फोटो शेअर करत म्हणाली, प्रेग्नेंसी…

बॉलीवूड मधल्या स्टार्सच्या आयुष्यात काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक असतात. पूर्वी एखाद्या मॅगझिनची किंवा वर्तमानपत्रामध्ये या स्टार्सच्या मुलाखतीची किंवा बातमीची वाट त्यांचे चाहते बघत असत. मात्र आता या परंपरेमध्ये चांगलाच बदल झाला आहे. आजच्या डिजिटल युगात, सोशल मीडियामुळे हे सेलिब्रिटीज सहजपणे आपल्या चाहत्यांसोबत संपर्क साधतात.
आपल्या आयुष्यात काय घडत आहे, त्याबद्दल त्यांना माहिती देतात. फोटोज, व्हिडियोजच्या माध्यमातून हे बॉलीवूडचे हे सितारे आपल्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देतात; आपल्या भावना व्यक्त करतात. त्यांचे चाहते देखील त्यांच्या या पोस्टला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतच असतात. बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री करीना कपूर देखील सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असते.
आपल्या चाहत्यांना, आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील घडामोडींबद्दल ती कायमच अगदी बिनधास्तपणे माहिती देत असते. तिची पोस्ट म्हणजेच तिचा फोटो किंवा व्हिडियो आला कि सोशल मीडियावर ती पोस्ट व्हायरल होतेच. चाहते त्यावर लाईक्सचा वर्षाव करतात. आता पुन्हा एकदा करीनाच्या एका व्हिडियोची जोरदार चर्चा सुरु आहे.
करीनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्य़ांना एक गुड न्यूज दिली आहे. विशेष म्हणजे, तिची ही गुडन्यूज ऐकुन सगळीकडूनच तीच तोंडभरून कौतुक होत आहे. तैमूर नंतर, आता काही दिवसांपूर्वी करिनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि करिना दुसऱ्यांदा आई बनली. आता पुन्हा एकदा तिने गुड-न्यूज देत आपल्या तिसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला आहे.
या व्हिडियोमध्ये ती आपल्या स्वयंपाकघरात उभी असून एका बेकिंग ट्रेमधून एक पुस्तक तिने बाहेर काढले आहे. या व्हिडियोसाठी कॅप्शन लिहताना करीना म्हणते की, हा माझा अभूतपूर्व प्रवास आहे. माझं ग’र्भधा’रणा आणि माझे ग’र्भधा’रणा पुस्तक बायबल. काही दिवस चांगले, तर काही वाईट होते.
मला कामावर जाण्याची घाई काही दिवस होती, तर काही दिवस अंथरुणाच्या बाहेर पडणही माझ्यासाठी क’ठीण होतं. माझ्या दोन्ही ग’र्भधार’णेदरम्यान, मी स्वतःमध्ये शारीरिक आणि भावनिक असे अनेक अनुभव घेतले. आणि त्याच अनुभवांबद्दल यामध्ये मी लिहिलं आहे, त्यामुळे हे पुस्तक माझ्या काळजाच्या खूपच जवळचे आहे.
करिनाने आज आपल्या या खास बायबल पुस्तकाची घोषणा अश्या अगदी वेगळ्या पद्धतीने केली आहे. आपल्या ग’रो’दरपणाचे सर्व अनुभव तिने या पुस्तकात सांगितले आहेत. आणि म्हणून करिना या पुस्तकालाच आपलं तिसरं मूल म्हणत आहे. या पुस्तकाबद्दल करीना पुढे लिहिते की, ”बर्याच वेगवेगळ्या प्रकारे हे माझं तिसरं मूल आहे”. तिचं हे पुस्तक लिहिण्यापासून ते प्रकाशित करण्यापर्यंत ज्या सर्वानी तिला मदत केली त्या सर्व व्यक्तींचे तिने मनापासून आभार मानले आहेत.
आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे दिवस, आपला आई बनायचा अभूतपूर्व प्रवास शेअर करताना मी चिंताग्रस्त आणि उत्साहित आहे, असे देखील करीना बोलली. अनेक बॉलीवूडकरांनी आणि चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत करिनाचं कौतुक केलं आहे. करीनाची बहीण करिश्माने देखील हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंन्ट केली आहे.
करीनाच्या चाहत्यांमध्ये तिच्या या पुस्तकाबद्दल चांगलीच उत्सुकता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अल्ट्रासाऊंड पकडून करीना कपूरने स्वत:चा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिने लिहिलं होत की, ‘मी काही रोमांचक गोष्टीवर काम करत आहे. पण तुम्ही जो विचार करत आहात ते हे नाहीये.
काही वेगळं आणि काही नवीन आहे. करीनाचा तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हा’यरल झाला आहे. आणि आता ती पुन्हा तिसऱ्यांदा आई होत आहे का, असा कयास लावण्यात येत होता. मात्र आपण लिहलेल्या पुस्तकाला तिने आपलं तिसरं मूळ म्हणून संबोधलं आहे.