‘कच्चा बादाम’ गायक भुबनचं आलं नवीन गाणं, सोशल मीडियावर घालताय धुमाकूळ, पहा video

‘कच्चा बादाम’ गायक भुबनचं आलं नवीन गाणं, सोशल मीडियावर घालताय धुमाकूळ, पहा video

कोलकात्याच्या रस्त्यावर शेंगदाणे विकणारा कच्चा बदाम फेम भुबन हा अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्याचे पूर्ण नाव भुबन बादायकर असे आहे. गेल्या अनेक वर्षापासून भुबन हा शेंगदाणे विक्रीच्या व्यवसायात आहे. कोलकात्यामध्ये खरमुरे यालाच कच्चा बदाम असे म्हणतात.

चांगले ठोकर असलेले शेंगदाणे तो हे तिखट मीठ मसाला लावून विक्री करतो. याला कच्चा बदाम म्हटले होते. शेंगदाणे विकण्यासाठी भुबन याने वेगळी कला आत्मसात केली आणि गाणे म्हणत त्याने हे शेंगदाणे विकण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने त्याने गाणे म्हणताना चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

हा व्हिडीओ एवढा व्हायरल झाला की त्याला रातोरात प्रसिद्धी मिळाली आणि लाखो रुपये त्याने कमावले. त्यानंतर त्याने लाईव्ह शो देखील केले. सोशल मीडियावर तो लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याला यु ट्यूब तसेच इतर माध्यमातून देखील पैसे मिळवायला सुरवात झाली. त्यानंतर त्याने काही शो देखील केल्याचे सांगण्यात येते.

त्याचे हे यश गेल्या काही दिवसातील आहे. 18 फेब्रुवारी रोजी त्याने कच्चा बदाम हे गाणे गायले होते. त्यानंतर तो यशोशिखरावर पोहोचला आता मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील अनेक कलाकारांनी या गाण्यावर नृत्य केले आहे. काही दिवसांपूर्वी अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी देखील कच्चा बदाम या गाण्यावर धमाल असे नृत्य केले होते.

कच्चा बदाम या गाण्याला यश मिळाल्यानंतर भुबन हा यशोशिखरावर पोहोचला. मात्र, आपण ज्या ठिकाणाहून वर आलो तो ठिकाण तो विसरला, असेच म्हणावे लागेल. कारण की काही दिवसांपूर्वी त्याने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने असे म्हटले होते की, मला आता शेंगदाणे म्हणजेच कच्चा बदाम विकण्याची लाज वाटते.

त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी त्याला ट्रो’ल केले. इतके दिवस तू त्याचा व्यवसायावर जगत होता आणि त्याच्या माध्यमातूनच तू मोठा झालास, असे देखील अनेकांनी म्हटले होते. त्यानंतर त्याला पैसे भरपूर मिळाले आणि त्याने एक कार खरेदी केली. कार खरेदी केल्यानंतर शिकताना त्याचा अ’पघा’त झाला आणि तो या जख’मी झाला होता. उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

कच्चा बदाम या गाण्याच्या यशानंतर आता देखील भुबन हा एक नवीन गाणे घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. हे गाणे नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहे. अतिशय जबरदस्तरित्या त्याने हे गाणे म्हटले आहे. अंगात पिवळा शर्ट आणि त्याने बॅग लावलेली दिसत आहे. काळा गॉगल देखील त्याने घातला आहे आणि तो नृत्य करताना या गाण्यावर दिसत आहे. त्याचे हे गाणे देखील लोकप्रिय ठरणार असे सांगण्यात येत आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.