‘कच्चा बादाम’ गर्लसोबत शिव ठाकरेने केला जबरदस्त डान्स, video सोशल मीडियावर व्हायरल…

‘कच्चा बादाम’ गर्लसोबत शिव ठाकरेने केला जबरदस्त डान्स, video सोशल मीडियावर व्हायरल…

मराठमोळा शिव ठाकरे सध्या चांगलाच चर्चेत आहे. शिव ठाकरेने मराठी बिग बॉसचे दुसरे पर्व जिंकले होते. आणि आता बिग बॉस हिंदीमधून देखील त्याने मोठा चाहतावर्ग कमवला आहे. सोशल मीडियावर त्याचे बरेच फॅन पेजेस आहेत. शिव ठाकरे सध्या अनेक कार्यक्रमात हजेरी लावत आहे.

त्यादरम्यान पापाराझींचा घोळका त्याच्यासमोरच असतो. आता तर शिवने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तो सोशल मीडियावर सगळीकडेच चर्चेत आला आहे. शिव ठाकरे ‘बिग बॉस 16’ ची ट्रॉफी जिंकण्यापासून एक पाऊल दूर राहिला असला तरीही त्याने लोकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

यामुळेच आज त्याचे चाहतेही त्याच्या प्रत्येक आनंदात सहभागी आहेत. पापाराजींनी शिव ठाकरेंचा कार शोरूम मधील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. शिवचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि आता शिवने आपल्या खास मित्रासाठी एका जंगी पार्टीचे आयोजन केलं.

‘बिग बॉस 16’ चे उपविजेते शिव ठाकरे यांनी काल रात्री म्हणजेच 18 मार्च 2023 रोजी आपल्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. बांद्रा च्या अंग्रेजी ढाबा वर शिवच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक टीव्ही स्टार्स उपस्थित होते. ‘बिग बॉस’च्या टोळीतील त्याचे मित्रही त्याला सामील झाले.

एमसी स्टेन आणि निमृत कौर अहलुवालिया वगळता त्यांचे सर्व मित्र शिवच्या पार्टीत दिसले. साजिद खान, अब्दु रोजिक, सुंबूल तौकीर खान, ‘बिग बॉस बुलेटिन’चा होस्ट शेखर सुमन, सौंदर्या शर्मा, ‘कच्छा बदम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंजली अरोरा देखील पार्टीत हजर होती.

याशिवाय शिव ठाकरेंच्या कार्यक्रमात मुनावर फारुकी, ‘झाशी की रानी’ फेम उल्का गुप्तासह अनेक स्टार्स दिसले. शिव ठाकरेच्या जल्लोषातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये शिवाला अंजली अरोरासोबत शिवने जोरदार डान्स केल्याचं दिसत आहे.

काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये अंजली अरोरा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्यासोबत सौंदर्या शर्मा देखील दिसत आहे, जी काळ्या मिडीमध्ये अप्रतिम दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये शिव ठाकरे शेखर सुमन आणि सुंबुल तौकीरसोबत नाचताना दिसत आहेत. दुसर्‍या व्हिडिओमध्ये शिव, अब्दू रोजिकसोबत नाचतानाही दिसत आहे.

आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. दरम्यान, ‘आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स 2023’ काल रात्री आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवने सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती म्हणून पुरस्कार पटकावला.

पुरस्कार सोहळ्यानंतरच शिवाने आपल्या खास लोकांसोबत पार्टी केली. मात्र अंजली अरोरा आणि शिवचा डान्स व्हिडियो सध्या सगळीकडे चर्चेत आला आहे. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच आवडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12