ओंकार भोजनेने ‘हास्यजत्रा’ सोडण्याबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला; ‘माझ्यामुळेच त्यांना..’

‘चला हवा येऊ द्या’ नंतर खूपच कमी कालावधीमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रसिद्ध झाला आहे. या शोमधील प्रत्येक कलाकार स्वतःला जोकून काम करताना दिसतो. तसेच या शोमुळेच अनेकांना स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकार या शोमुळेच घराघरात पोहचले.
गेल्या एपिसोडमध्ये सर्कस चित्रपटाच्या कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यात दिग्दर्शक रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि पूर्ण सर्कस चित्रपटाची टीम उपस्थित होती, त्यावरून तुम्ही या शोच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हा शो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला होता.
आपल्या विनोदाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने गेली काही वर्षे सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून खळखळून हसवले. या कार्यक्रमाचा आणि पर्यायाने ओंकार भोजनेचा देखील चाहतावर्ग मोठा आहे. पण काही दिवसांपूर्वी त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला.
तो महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडून ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात गेला. त्यावरून त्याच्यावर टीका देखील झाली. आता ‘फू बाई फू’ कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ओंकारवर अनेकजण टीका करताना दिसत आहेत. मात्र आता यावर स्वतः ओंकारने खुलासा केला आहे.
ओंकार एक उत्कृष्ट नट आहे यात शंका नाही. मात्र त्याने अचानक महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते. शो का सोडला याबाबत त्याने खुलासा केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून गाजलेला ओंकार भोजने आता लवकरच चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
‘सरला एक कोटी’ असे या चित्रपटाचे नाव असून अत्यंत वेगळ्या धाटणीची अशी त्याची भूमिका आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो बऱ्याच ठिकाणी भेट देत आहे. याच निमित्ताने एका मुलाखतीत बोलताना त्याने हास्यजत्रा सोडण्याचे कारण सांगितले.
हास्यजत्रा करत असताना मला २ चित्रपटाच्या ऑफर आल्या होत्या. पण चित्रपटासाठी शोच्या निर्मात्यांना माझ्या वेळेनुसार जुळवून घ्यावे लागत होते. आणि त्यात खूप वेळ खर्च होत होता. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचं ठरवले. त्यातच माझी प्रकृती ठीक नसल्याने मी ‘हास्यजत्रा’ मधून कायमचा ब्रेक घेतला..
फु बाई फु मध्ये जाण्याचे कारण सांगत ओंकार म्हणाला;’ मी ‘फू बाई फू’ केलं कारण मला एक फोक प्रकार करायचा होता. ती संधी मला त्या कार्यक्रमात मिळाली म्हणून मी तिथे गेलो. विशेष म्हणजे या सगळ्यातून मी शिकत गेलो माझं सध्या चांगलं चाललं आहे.’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.