ऐश्वर्या रायसोबतच्या इंटीमेट सीनबद्दल रणबीरचा खुलासा, म्हणाला; माझे हात थरथर होते, लाज वाटत होती, पण ऐश्वर्या मात्र…

ऐश्वर्या रायसोबतच्या इंटीमेट सीनबद्दल रणबीरचा खुलासा, म्हणाला; माझे हात थरथर होते, लाज वाटत होती, पण ऐश्वर्या मात्र…

ऐश्वर्या राय हे नाव माघील कित्येक वर्षांपासून आपल्या बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्ये देखील चांगलंच लोकप्रिय आहे. ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंक्यपूर्वीच जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून सगळीकडेच ऐश्वर्याची चर्चा सुरु होती. मिस वर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली.

साऊथच्या जीन्स या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. आणि त्यानंतर अनेक बॉलीवूड आणि साऊथच्या सिनेमामध्ये देखील तिने काम केले. इतकेच काय तर, तिने अनेक हॉलीवूडच्या सिनेमामध्ये देखील काम केले. ९० च्या दशकातील मुलांमध्ये ऐश्वर्या रायबद्दल एक वेगळंच आणि खास आकर्षण होत.

त्यामध्ये केवळ सर्व साधारण मुलंच नाही तर अनेक सेलेब्रिटीचा देखील समावेश आहे. सध्या बॉलीवूड मध्ये काम करणारे कित्येक सेलेब्रिटी कलाकार स्वतः उघडपणे मान्य करतात की ऐश्वर्या त्यांची क्रश थोडक्यात पहिलं प्रेम होती. तिला समोर बघायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र असंच काही रणबीर कपूरचं देखील मत आहे.

बॉलीवूडचा चॉकोलेट बॉय म्हणून रणबीरला ओळखलं जातं. रणबीर कपूरचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. फिमेल फॅन्समध्ये तर त्याची चांगलीच क्रेझ आहे. मात्र असं असलं तरीही, ऐश्वर्या बद्दल त्याच्या मनात एक खास आणि वेगळीच भावना आहे. ऐश्वर्याला रणबीर खूप आधीपासून ओळखतो. तो जेव्हा टिनेजर होता तेव्हा ऋषी कपूर दिग्दर्शन करत असलेल्या ‘आ अब लौट चले’ सिनेमात ऐश्वर्या काम करत होती.

त्यादरम्यान अनेक वेळा रणबीर आणि ऐश्वर्याची भेट होत असे. त्यामुळे सुरुवातीपासूनच रणबीर कपूर देखील ऐश्वर्या कडे आकर्षित होता. करण जोहरच्या ‘ए दिल है मुश्किल,’ या सिनेमात रणीबर कपूरला ऐश्वर्या रायसोबत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरचे काही इंटिमेट सिन देखील आहेत.

तिच्यासोबत असे सिन करताना नक्की काय वाटलं, असा प्रश्न रणबीरला अनेक मुलाखतीमध्ये विचारण्यात आला होता. त्याबद्दल बोलताना रणबीर म्हणाला होता, ‘ऐश्वर्या सोबत रोमान्स करणं आपल्या देशातीलच काय तर जगातील जवळपास सर्वच मुलांची अपूर्ण इच्छा. मला माझी इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळाली यामुळे मी आनंदित आहे.

मात्र जेव्हा तिच्यासोबत इंटिमेट सिन द्यायचे होते त्यावेळी मला काहीच समजत नव्हते. तिला स्पर्श करताना माझे हात थरथर का’पत होते. तिच्या गालाला हात लावताना मी घामाघूम झालो होतो आणि लाज वाटत होती ते वेगळं. त्यानंतर ऐश्वर्या स्वतः म्हणाली, आपण अभिनय करत आहे.

जास्त विचार का करत आहेस. आपलं काम आहे, आणि आपल्याला करावं लागणारच ना? त्यानंतर मी ते सिन पूर्ण करू शकलो.’ रणबीर कपूर आणि ऐश्वर्याचे ते इंटिमेट सिन खूप जास्त चर्चेचा विषय ठरले होते. अनेकजण तर केवळ ऐश्वर्याला पाहण्यासाठी तो सिनेमा बघायला गेले होते.

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.