ऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…

ऐश्वर्यावर सलमान आधी ‘हा’ अभिनेता झाला होता लट्टू ; पण ‘या’ व्यक्तीने ध’म’की दिल्यामुळे झाला दूर…

काल म्हणजेच १८ जून रोजी, ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे सलमान खान याने संजय लीला भन्साळी ला टॅग करत, जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर, सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरु झाल्या. सलमान खानचे, ऐश्वर्या साठीचे प्रेम आपल्या सर्वाना माहीतच आहे.

सलमानचे तिच्यासाठीचे प्रेम संपूर्ण जगाला ठाऊक आहे. मात्र, सलमान च्या आधी अजून एक अभिनेता आहे जो तिच्यावर पूर्ण लट्टू झाला होता. मात्र त्याला एका व्यक्तीने तिच्यापासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली होती आणि म्हणून तो तिच्यापासून दूर राहिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, सक्त ताकीद देणारी व्यक्ती देखील सलमान खान नव्हता.

सलमानच्या आधी संजय दत्त, ऐश्वर्यावर फिदा झाला होता. संजय दत्त आपल्या, चित्रपटांपेक्षा जास्त वैयक्तिक गोष्टींमुळेच च’र्चेत असतो. मात्र हाच संजय दत्त ऐश्वर्या वर पूर्ण फिदा झाला होता हे खूप कमी व्यक्तींना माहित आहे. अभिनेत्री टीना मुनीम, माधुरी दीक्षित या दोघींसोबत, संजय दत्तचे नाव अनेक वेळा जोडण्यात आले होते.

मात्र ऐश्वर्या संजय दत्तला खूपच जास्त आवडली होती. १९९४ मध्ये ऐश्वर्याने ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकून तिने १९९७मध्ये ‘और प्यार हो गया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मिस वर्ल्ड चा खिताब जिंकण्यापूर्वीच ऐश्वर्या एक खूप मोठी आणि लोकप्रिय मॉडेल होती. १९९३ मध्ये फिल्मफेअर मॅग्झीनच्या फ्रंटपेजसाठी ऐश्वर्याने संजय दत्तसोबत फोटोशूट केले होते.

‘फिल्मफेअर’ मॅगझीनला दिलेल्या एका जून्या मुलाखतीमध्ये संजय दत्त ने सांगितले होते की, ऐश्वर्याला पहिल्यांदा त्याने कोल्ड ड्रिंक ब्रँडच्या एका जाहिरातीमध्ये पाहिले होते. तेव्हा सर्वसाधारण लोकांप्रमाणेच, संजय देखील ऐश्वर्याला पाहील आणि बघतचं राहिला.

ऐश्वर्याला पाहून तो म्हणाला, ‘ही सुंदर मुलगी कोण आहे?’ ऐश्वर्याबरोबरज्यावेळी संजय दत्त शूट करणार होता, तेव्हा त्याच्या बहिणीने त्याला ऐश्वर्याचा नंबर घेऊ नको किंवा तिला फुले पाठवू नकोस असा सक्त इशारा दिला होता. संजय म्हणाला, “खरतरं माझ्या बहिणींना ऐश्वर्या प्रचंड आवडते. कारण ती खूप सुंदर आहे. ती त्यांना आधीच भेटली सुद्धा आहे.

माझ्या बहिनीने मला ताकीद दिली होती की ऐश्वर्याच्या जवळ जाण्याचा विचार देखील करू नकोस. तिचा नंबर घेऊ नकोस आणि तिला फुलं देखील पाठवू नकोस.” त्यातच संजय म्हणाला,” जेव्हा तुम्ही ग्लॅमरच्या क्षेत्रात येतात तेव्हा ते तुम्हाला बदलू लागते आणि मग आपण मोठे होऊ लागतो त्यामुळे तो निरागसपणा निघून जातो.

ऐश्वर्या सध्या जितकी सुंदर आहे ते तिच्या चेहऱ्यावरून अदृश्य होईल कारण तिला या चित्रपटसृष्टीला सांभाळाव लागेल जे इतक सोप नाही.”दरम्यान, मॅग्झीनचे शूट झाल्याच्या बऱ्याच वर्षांनंतर संजय दत्त आणि ऐश्वर्याने एकत्र चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी फक्त ‘शब्द’ आणि ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शब्द सिनेमामधील त्यांची केमिस्ट्री, सर्वाना खूप आवडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12