फिटनेसच्या बाबतीत दिशा पटानीलाही टक्कर देते ऐश्वर्या रायची वहिनी, पहा सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ…

ऐश्वर्या राय म्हणलं कि, सर्वात पहिले येतात तिचे सुंदर आणि आकर्षित डोळे. विश्वाच्या सर्वात सुंदर ऐश्वर्याचे डोळे तिच्या सौंदर्याला साजेसे आहेत. ऐश्वर्या ने वयाचा १७व्य वर्षीच मॉडेलिंग सुरु केली होती. तिने जसा या ग्लॅमरचा दुनियेत प्रवेश केला, तशी ती कयामच चर्चेचा विषय बनतच राहिली आहे.
जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिने अधिक चर्चा रंगवली होती, आणि मग ती मिस वर्ल्ड देखील बनली. केवळ भारतातच नाही तर तिची चर्चा संपूर्ण जगात होते. कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये ती नक्की कोणता ड्रेस घालत आहे, कोणत्या डिझायनर चा आहे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते.
कान्स मध्ये तिच्या सौंदर्याबद्दल आणि तिच्या स्टाईलबद्दल कायमच चर्चा होत असते. माघील काही वर्षांपूर्वी जेव्हा आराध्या ला तिने जन्म दिला होता, त्यानंतर तिचे वजन चांगलेच वाढले होते. तेव्हा जगातल्या मोठ्या न्यूज चॅनेल वर तिच्या वाढलेल्या वजनाची चर्चा होती. तिचे वाढलेल वजन हा जणू एक खूप मोठा मुद्दाच झाला होता. मात्र त्यानंतर काहीच दिवसांमध्ये तिने आपले वजन कमी केले आणि पुन्हा फिट झाली.
कारण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमामध्ये तर तिने आपल्या ग्लॅमरस लूक ने सगळ्यांचं घायाळ केले होते. केवळ ट्रेलर मध्ये तिची ग्लॅमरस अदा बघून, फक्त आणि फक्त ऐश्वर्या ला बघण्यासाठी चाहत्यांनी त्या सिनेमा हॉल मध्ये गर्दी केली होती. आपल्या फिटनेस ने तिला पुन्हा चर्चेमध्ये आणलं.
सासरचं कुटुंबच बॉलीवूडकर असल्यामुळे त्यांची चर्चा नेहमीच रंगते, मात्र सध्या चर्चा सुरु आहे ती तिच्या माहेर म्हणजेच तिच्या वाहिनीबद्दल. ऐश्वर्या जितकी फिट आहे तिच्यापेक्षा देखील जास्त फिट तिची वाहिनी आहे. आणि आता तिच्या वाहिनीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे.
झालं असं, काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिने आपले वर्कआऊट करतानाचे व्हिडियो शेअर केले. श्रीमा ने आपले व्हिडियो शेअर केली आणि चर्चेला उधाण आलं. फिलाडेफ्लिया मध्ये श्रीमा लहानाची मोठी झाली मात्र मॉडेलिंग करिअर करिता ती मुंबईमध्ये आली आणि आदित्य सोबत लग्न करुन मुंबईतच स्थायिक झाली.
श्रीमा मॉडेलिंग देखील करत होती, मिस इंडिया ग्लोब २००९ मध्ये तिने विजेतेस्थान पटकावले होते. खास म्हणजे ती दोन मुलाची आई आहे, तरीही तिचा फिटनेस कमालीचा आहे. आपल्या व्हिडियोमध्ये तिने काही फिटनेस टिप्स देखील दिल्या. आपल्या काही फोटोमध्ये नेहमीच आपली टोन्ड बॉडी ती फ्लॉन्ट करत असते.
ती सध्या डिजिटल क्रिएटर आणि इन्फ्ल्यूएन्सर म्हणून काम करत आहे. श्रीमा ने अनेक वेळा आपले फिट आणि ग्लॅम फोटोज शेअर केले आहेत. तिने शेअर केलेला व्हिडियो तुफान वायरल होत असून तिच्या फिटनेसचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
आपले ऍब्स आणि टोन्ड लेग्स आणि पूर्ण फिट बॉडी यांचे रहस्य काय आहे असे सांगत तिने काही फिटनेस टिप्स नेटकऱ्यांना दिल्या. अरे तू तर ऐश्वर्या सारखीच फिट आहे, असे अनेक नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडियो वर कमेंट केले आहे. आपल्या कुटुंबासोबत आणि नणंद ऐश्वर्या सोबत तिने अनेक वेळा फोटोज शेअर करत असते.