ऐतिहासिक सिरीज जिंकल्यानंतर रवी शास्त्रीने अजिंक्य नाही तर विराटला दिले यशाचे पूर्ण श्रेय, म्हणाले…

भारत आणि ऑस्ट्रेलिया मध्ये झालेल्या 4 टेस्ट मॅचच्या दरम्यान बॉर्डर गावस्कर सीरीज मधील शेवट्यच्या काही टेस्ट मध्ये भारतीय संघाने शानदार प्रदर्शन दाखवलं, भारतीय टीम ह्या यशानंतर खूप आनंदित आहे तर कार्यवाहक कप्तान अजिंक्य रहाणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, परंतु एवढी मोठी सिरीज जिंकून सुद्धा भारतीय टीमचे कोच रवी शास्त्री यांनी त्याच श्रेय अजिंक्य रहाणेला न देता विराट कोहलीला दिलंय.
बॉर्डर गावस्कर सिरीज मध्ये चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये टीम ऑस्ट्रेलियाला 3 रणांनी हरवून भारताने आपला झेंडा फडकवला, भारताला जिंकण्यासाठी 328 रणाचं लक्ष्य मिळालं होत त्यांनी हा स्कोर 7 विकेट 97 व्या ओवर मध्ये परत मिळवला, भारत – ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) चे खरे यशाचे हक्कदार त्यातील फलंदाजी करणारे खेळाडू आहेत, शुभमन गिलने 91 आणि ऋषभ पंतने नाबाद 89 रणांची पारी खेळली.
भारतीय टीम मधील फलंदाज आणि गोलंदाजवर नजर टाकावी म्हंटली तर भारतीय संघांच्या खेळाडूंनी महत्वपूर्ण अस योगदान दिले आहे, भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया समोर आपलं एकजुटीच मजबूत प्रदर्शन दाखवून यश मिळवलं. भारतीय संघाचे कार्यवाही कॅप्टन अजिंक्य रहाणेने यात आपली मुख्य भूमिका दाखवली होती.
कोहलीच्या कॅप्टनसी मध्ये एडिलेड टेस्ट हरल्यानंतर भारतीय संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा अजिंक्य रहाणेने चांगलंच यश मिळवत पहिली मेलबर्न टेस्ट जिंकली, मॅच संपल्यानंतर रवी शास्त्री जेव्हा सोनी टीव्हीशी वार्तालाप वेळी त्यांनी अस सांगितलं की जे ऐकून सगळ्यांना आश्चर्यकारक धक्का बसला.
म्हणजेच रवी शास्त्री यांनी मॅच जिंकल्याचा श्रेय विराट कोहलीला सुद्धा दिल रवी शास्त्री बोलताना म्हणाले…” विराट कोहली जरी संघांचा भाग आत्ता नसला, तरीपण तो आमच्यासोबत कायम आहे कारण ही भारतीय टेस्ट टीम 5-6 वर्षात कष्ट करून बनली आहे, विराटची जी भूमिका असते ती ह्या संघात दिसून येते.”
रवी शास्त्री म्हणाले की संघ 5-6 वर्षांनंतर तयार झाला, परंतु रवी शास्त्री जे म्हणाले ते आश्चर्य करण्यासारखी बाब होती परंतु ज्या भारतीय टीमने यशाची पायरी चढवून दिली त्यातले खूप क्रिकेटपटू बाहेर होते ज्याचा डेब्यु कोहलीच्या कॅप्टनसी वर झाला होता.भारतीय संघात टी नटराजन, नवदीप सैनी, शार्दूल ठाकुर, शुभमन गिल आणि सुंदर अशे खेळाडू होते.
ज्याना कोहली कॅप्टनसी करत असताना कधीच जागा नाही मिळाली. ह्या सगळ्यांनी मिळून अजिंक्यच्या कॅप्टनसीचा डेब्यु केला होता. भारतीय संघमध्ये हिस्सा पुजारा, रोहित शर्मा, जडेजा, अश्विन आणि अजिंक्य रहाणे, कोहली यांची कॅप्टनसीच्या आधीच इंडिया टेस्ट फॉर्मेट मध्ये ते प्रतिनिधित्व करत होते, कोहलीच्या कॅप्टनसी वेळी पंतचा डेब्यु झाला होता ते तर खूप वेळा टेस्ट टिमच्या प्लेइंग इलेवन मध्ये बाहेरच होते.