एके काळी मराठी चित्रपटसृष्टीत दबदबा असलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे आज झालेले हा’ल, पाहून च’कित व्हाल…

मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री सध्या अंथरुण धरून आहे. त्यांनी एके काळी आपल्या अभिनय कौशल्याने मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. त्यांचे नृत्य कौशल्य हे अप्रतिम होते, त्यांना मराठीची पहिली लावण्यवती अभिनेत्री देखील म्हणले जाते.
आम्ही बोलत आहोत मराठीची ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्याबद्दल. प्रतिकूल परिस्थितीत अभिनय सामर्थ्याच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान आणि वेगळी ओळख निर्माण करणार्या कलावंत म्हणून मधू कांबीकर यांना ओळखले जाते.
अभिनेत्री मधू यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार असल्यामुळे अभिनयाचे सर्वगुण त्यांना वडीलांकडूनच मिळाले होते. लहानपणापासूनच मधू यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. कलाक्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मोठे यश मिळवले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील या ज्येष्ठ अभिनेत्रीने चित्रपट आणि नाटकमधील अभिनय आणि लावणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. सध्या त्या आजारपणामुळे चित्रपटसृष्टीपासून दुरावल्या आहेत. त्यांच्या आजारपणामुळे त्या अंथरुणाला धरून आहेत.
पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी वर्ष २०१६ मध्ये माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या लावण्य संगीत या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. तरीही त्यांनी कार्यक्रम सुरूच ठेवला.
त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना प’क्षाघा’ताचा सौम्य झ’ट’का आला. त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला होता. त्यामुळे त्यांना रु’ग्णा’लयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. अभिनेत्री मधू कांबीकर या तब्बल १२ वर्षांनी नृत्य करायला उभ्या राहिल्या होत्या.
याआधी १२ वर्षांपूर्वी अशाच एका कार्यक्रमात त्यांना त्रास झाला होता. त्यामुळे नृत्य न करण्याचा निर्णय त्यांनी तेव्हा घेतला होता. दोन नृत्य सादर झाल्यानंतर त्या भैरवी सादर करण्यासाठी रंगमंचावर आल्या होत्या. परंतु त्यांना अ’स्वस्थ वाटू लागले. याच आ’जा’रपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळून आहेत.
सखी माझी लावणी हा कार्यक्रम त्यांचा विशेष लोकप्रिय झाला होता. एवढेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास समजावा यासाठी त्यांनी लावणी सं’दर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास लोकांसमोर आणण्याचे काम केले.
यात त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी मोठी मदत केली होती. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले होते. पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच यशस्वी झाला.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या शापित चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर त्यांनी एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा बऱ्याच चित्रपटात काम केले आहे.