एका चित्रपटासाठी 150 कोटी घेणारा प्रभास, आईची ‘ती’ इच्छा पूर्ण करू शकला नाही…

बाहुबली या चित्रपटातून प्रभास देशभरातील घराघरात पोहोचला. अभिनेता प्रभास हा लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. प्रभास याने दक्षिणेत अनेक चित्रपट केले आहेत. मात्र, बाहुबली या चित्रपटातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचा बाहुबलीचा दुसरा भाग देखील आला.
पहिल्या भागामध्ये आपल्याला तमन्ना भाटिया ही दिसली, तर अनुष्का शेट्टी ही देखील दिसत होती, तर दुसऱ्या भागात अनुष्का शेट्टी सोबत रोमान्स करताना दिसला होता. या चित्रपटात राणा दग्गुबती याची भूमिका देखील होती. अनुष्का शेट्टी सोबतचा रोमान्स त्याचा प्रचंड गाजला होता. मात्र, आता प्रभास याच्या बाबतीत काही बातम्या समोर आलेल्या आहेत.
प्रभास हा कोट्यवधी रुपयांचा मालक असला तरी आईची एक इच्छा पूर्ण करू शकला नाही. बाहुबली या चित्रपटातील सर्व भूमिका या लोकप्रिय ठरल्या होत्या. प्रभासची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. भल्लालदेव हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. देवसेना ही भूमिका देखील खूप लोकप्रिय ठरली होती. अनुष्का शेट्टी हिने अतिशय जबरदस्त काम या चित्रपटात केले होते.
प्रभास आणि अनुष्का यांच्यातील सीन देखील लोकप्रिय झाले होते. तर या चित्रपटानंतर अनुष्का शेट्टी आणि प्रभास हे प्रेम प्रकरणात असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर या दोघांनी खुलासा केला की, आमच्यामध्ये असे कुठल्याही प्रकारचे सं’बंध नाहीत. आम्ही केवळ मित्र आहोत, असे तिने म्हटले होते.
प्रभास याने अलीकडच्या काळात साहो हा चित्रपट देखील केला. मात्र, साहो चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. या चित्रपटामध्ये प्रचंड ॲक्शन आणि तांत्रिक बाजू आपण पाहिली. असे असूनही हा चित्रपट फारसा कमाल करु शकला नाही. त्यामुळे प्रभास याच्या पदरी निराशा पडली, असे म्हणता येईल. प्रभास हा आपल्या अनोख्या स्टाईल साठी देखील ओळखला जातो.
प्रभास हा एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेणारा अभिनेता आहे. दक्षिणेमध्ये त्याचा एक वेगळ्या प्रकारचा चाहता वर्ग आहे. दक्षिणेतील कलाकारांना येथील प्रेक्षक हे देवाप्रमाणे मानतात. प्रभास देखील हा त्यांच्यासाठी देवाप्रमाणे आहे. प्रभासच्या बाबतीत एक बातमी सध्या नुकतीच समोर आली आहे. ही बातमी म्हणजे प्रभास याने त्याच्या आईची इच्छा पूर्ण केली नाही.
आता अनेकांना असा प्रश्न पडला आहे, अशी कुठली इच्छा आहे की, तो पूर्ण करू शकला नाही. तर त्याची आई शिवकुमारी यांच्या मताप्रमाणे प्रभास याने लवकरात लवकर लग्न करावे आणि मुलाचा बाप व्हावे. मी आजी म्हणून नातवाला खेळवावे, अशी त्याची इच्छा आहे. मात्र, प्रभास अजूनही त्यांची ही इच्छा पूर्ण करू शकला नाही. मात्र, येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो लवकरच लग्न करेल आणि आईची इच्छा पूर्ण करेल, असे दिसत आहे.