एकाच चित्रपटात दिसणार सनी लिओनी आणि जॉकी श्रॉफ, त्यांचा हॉट video पाहून चाहतेही झाले चकित…

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी सुभाष घई यांच्या हिरो चित्रपटातून मनोरंजन सृष्टीमध्ये पाऊल ठेवले. आणि त्यानंतर कधीच माघे वळून पहिले नाही. कोणीतही पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या लूक आणि दमदार अभिनयाच्या जोरावर जॅकी श्रॉफ यांनी बॉलीवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे.
बॉलीवूड मध्ये त्यांनी एक काळ अक्षरशः गाजवला आहे. त्यावेळी त्यांचे कित्येक चाहते त्यांच्यासाठी वेडे झाले होते. आता काळ लोटला आहे. असं असलं तरीही अद्याप देखील जॅकी श्रॉफ यांचा एक खास चाहता वर्ग पाहायला मिळतो. रोमान्सपासून नकारात्मक पात्रांपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपली खास छाप सोडली आहे.
त्यांचे अनेक चित्रपट आज देखील चाहत्यांचे आवडते आहेत. आणि आता अभिनेता जॅकी श्रॉफ त्याच्या कारकिर्दीतील सर्वात भयानक अवतारात पुनरागमन करत आहे. ‘कोटेशन गँग’ या चित्रपटात तो दिसणार असून, त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये जॅकी श्रॉफ अतिशय उग्र अवतारात दिसत आहे.
त्यांच्या या लूकने सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. जॅकी श्रॉफ 80 च्या दशकात चित्रपटांमधील त्याच्या गँगस्टर पात्रासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. आता तो पुन्हा एकदा या गँगस्टरच्या भूमिकेत परतला आहे. मात्र ही त्यांची आजपर्यंतची सर्वात डेन्जरस भूमिका असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कोटेशन गँगमध्ये सनी लिओनी देखील आहे आणि तिचा अवतार खूपच वेगळा आणि सर्वाना चकित करणारा ठरत आहे.
ट्रेलर पाहून चित्रपटाची कथा गँगवॉर आधारित असल्याचे दिसते. चेन्नई, काश्मीर आणि मुंबईमध्ये पसरलेल्या वेगवेगळ्या गँग्सची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरची सुरुवात एका संवादाने होते की गॅंगचे सदस्य बनणे सोपे नाही. तेव्हा सनी लिओनी अत्यंत डेन्जरस अवतारात प्रवेश करते.
शस्त्रे घेऊन ती दुसऱ्या गँगच्या मुख्य व्यक्तीला मारायला जाते आणि म्हणते – फक्त एका गॅंगचा प्रमुखच दुसऱ्या गँगच्या प्रमुखला मारू शकतो. ‘कोटेशन गँग’च्या ट्रेलरमध्ये खूप हिं’साचार पाहायला मिळतो, त्यामुळे साहजिकच चित्रपटातही खूप हिं’सा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘कोटेशन गँग’ चे दिग्दर्शन विवेक के कन्नन यांनी केले आहे.
हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणी देखील ‘कोटेशन गँग’मध्ये दिसणार आहे. ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजमध्ये तिने मनोज बाजपेयींच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात ती कॉन्ट्रॅक्ट किलरच्या भूमिकेत आहे. ‘कोटेशन गँग’ या वर्षी रिलीज होणार आहे.