एअरपोर्टवर सारा सोबत घडला धक्कादायक प्रकार! चाहतीने हात मिळवल्यानंतर नको तिथं केला स्पर्श..Video Viral…

नवाब कुटुंब म्हणलं की, अगदी राजेशाही थाट बाट आपल्या समोर उभे राहतात. त्यांच्याबद्दल वेगळेच आकर्षण सगळ्यांच्या मनात असते. अशा राजेशाही कुटुंबात जन्म घेतलेल्या व्यक्तीकडे कोटींची प्रॉपर्टी असते. तसेच बॉलीवूडमधील सेलेब्रिटी नवाब कुटुंब म्हणून पतौडी खानदान ओळखले जाते.
सैफ अली खानला संपूर्ण बॉलीवूड, नवाब म्हणून ओळखते. त्याचे हावभाव, चालणं, बघून रॉयल अनुभव येतोच. त्याची मुलगी सारा मात्र, नवाबी म्हणजेच राजेशाही थाट-बाटाहुन अत्यंत वेगळी आहे. सारा अगदी साधारण आयुष्य जगणे पसंत करते. याबद्दल तिने अनेकवेळा सांगितले देखील आहे.
त्यामुळे सारा अली खानचा मोठा चाहतावर्ग बघितला जातो. नुकतंच पुन्हा एकदा सारा अली खानचा अगदी साधेपणा समोर आला आहे. एअर पोर्टवर एका चाहतीने तिच्यासोबत असं काही केलं, की सारा च्या जागी एखादा दुसरा सेलेब्रिटी असता तर त्याला संताप अनावर झाला असता.
मात्र, साराने आपल्या चाहतीसोबत जे काही केलं, ते अगदी खेळीमेळीने घेतलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अलीकडेच तिची आई अमृता सिंगसोबत मुंबई विमानतळावर दिसली. विमानतळावर, साराशी हस्तांदोलन आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने, एका चाहत्याने अभिनेत्रीला अशा ठिकाणी स्पर्श केला, त्यानंतर सारा देखील संकोचलेली दिसली.
या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा अली खानची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. नुकताच सारा अली खानचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सारा मुंबई विमानतळावर दिसत आहे. एअरपोर्टवर चालत असताना, सारा तिच्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक करत आहे, तेव्हाच एक महिला फॅन येते जी आधी अभिनेत्रीशी हस्तांदोलन करते,
मग चालताना अभिनेत्रीच्या गालाला तिच्या घशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. या चाहतीच्या अशा वागणुकीमुळे सारा देखील चांगलीच हैराण झाली आहे. या चाहतीच्या अनपेक्षित वागणुकीमुळे सारा चांगलीच दचकली आणि थोडी घाबरली देखील. मात्र यातून तिने स्वतःला सावरलं आणि त्या चहातील जाऊ दिल.
सारा अली खानचे हे वागणे सोशल मीडियावर चाहत्यांना खूपच आवडले आहे. अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. दरम्यान, दुसरीकडे अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दित आहेत. एक जण म्हणतो की, महिलेला दागिने चोरायचे होते. तर अजून एक युजर म्हणतो, ‘नाही. तिला स्कार्फ चोरायचा होता.’ अनेकांनी साराचे कौतुक करत म्हणलं आहे की, ‘सारा खूप मॅच्युअर झाली आहे.’