उर्मिला मातोंडकरने ‘छम्मा छम्मा’च्या शूटिंगबाबत खुलासा, म्हणाली; मी र’क्तबं’बाळ झाले होते आणि डायरेक्ट मात्र…

बॉलीवूड असेल किंवा साऊथ इंडस्ट्री असेल किंवा मराठी सिनेसृष्टी असेल, आपल्याला सिनेमामध्ये आयट्म बघायला मिळताच. आयटम सॉंग ही बॉलीवूडची ट्रेंडच आहे. नक्की कधी पासून बॉलीवूडमध्ये ही ट्रेंड सुरु झाली हे आपण सांगू शकत नाही. मात्र कोणत्याही सिनेमात एखाद आयटम सॉंग असेल तर सिनेमा जास्त प्रसिद्ध होण्यास मदत होते.
एखादी प्रसिद्ध अभिनेत्री, जेव्हा आयटम सॉंग करते तेव्हा तिचे चाहते साहजिकच ते गाणं बघण्यासाठी थिएटर मध्ये गर्दी होतेच. आपण ते गाणं चांगलं एन्जॉय करतो. मात्र त्या गाण्यासाठी अभिनेत्रीने आणि मेकर्सने चांगलीच मेहनत घेतली असेल, याबद्दल आपण कधीच विचार करत नाही. त्याचबरोबर जर आयटम सॉंग हटके असेल तर ते जास्त लोकप्रिय ठरते.
पण असं हटके आयटम सोंग बनवण्यासाठी अभिनेत्रींची मात्र चांगलीच कसरत होते. शोले सिनेमात हेमा मालिनी यांनी ‘जब तक है जान,’ गाण्यात खरोखर चक्क काचेवर डान्स करून सगळ्यांना चकित केलं होत. अलीकडे दीपिका पदुकोण ने राम लीला मधील ‘नगडा संग ढोल बाजे’ गाण्यात डान्स करताना पायाला ज’खमा झालेल्या असताना देखील डान्स पूर्ण केला होता.
असं आपण अनेक गाण्यांबद्दल आणि अभिनेत्रीं बद्दल बघितलं आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या बाबतीत देखील एका आयटम सॉंगच्या वेळी असंच काही घडलं होत. रंगीला गर्ल म्हणून बॉलीवूमध्ये उर्मिला प्रसिद्ध आहे. तिने रंगीला सिनेमात आपल्या मा’दक आणि तितक्याच चुणचुणीत अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मन जिंकली होती.
त्यानंतर तिने कधीच माघे वळून नाही पाहिलं. एका पाठोपाठ एक, अनेक सुपरहिट सिनेमा देत तिने बॉलीवूडमध्ये आपली खास जागा निर्माण केली. सध्या उर्मिला राजकारणात सक्रिय झाली असल्याच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरीही, ती अजूनही बॉलीवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान तिला आपल्या करियरमधील सगळ्यात हटके आणि तेवढाच अवघड किस्सा कोणता होता, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावेळी तिने चायनागेट सिनेमा मधील आयटम सॉंग शूटिंग करताना झालेल्या किस्सा बद्दल सांगितले. चायनागेट मधील ‘छम्मा छम्मा’ हे गाणं काहीच दिवसांपूर्वी रिक्रीएट करण्यात आलं. मात्र, उर्मिलाच्या अंदाजाची आणि डान्सची सर आली नाही. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी उर्मिलाला कमालीचा त्रा’स भो’गावा लागला होता.
‘सिनेमाच्या थीम प्रमाणे मला गाण्यासाठी बंजारानंचा लूक घ्यायचा होता. त्यामुळे अंगावर खूप सारे जड दागिने घालणे आवश्यक होते. ते सर्व दागिने तब्ब्ल १५ ते २० किलोचे होते. त्या दागिन्यांमुळे मला डान्स करताना थोड्या अडचणी येत होत्या, त्यात मला रिहर्सल करायला वेळ नाही मिळाला. राजकुमार संतोषी मला बोलले होते की, हवं असेल तर काही दागिने कमी करू शकतो.
पण गाण्याच्या स्टेप्समध्ये त्यांना देखील बदल नको होता. मी देखील लूक आणि स्टेप्सचे गाण्यासाठी महत्व समजले आणि आहे तेवढे दागिने ठेवून डान्स केला. त्यानंतर मात्र माझ्या कानातून र’क्त येत होते. गाणं झाल्यानंतर माझ्या श’रीरावर जागोजागी ज’खमा झाल्या होत्या. काही ज’खमांमधून र’क्त येत होते. पण गाणं सुपरहिट ठरलं आणि त्यातच मला समाधान मिळालं,’ असं उर्मिलाने आपल्या गाण्याच्या किस्सा बद्दल सांगितलं.