इम्रान हाश्मीच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीसोबत केएल राहुलने मारलीये मज्जा! तर एक वेळा आथियाच्या या मैत्रिणींसोबतच त्याने

इम्रान हाश्मीच्या ‘या’ हॉट अभिनेत्रीसोबत केएल राहुलने मारलीये मज्जा! तर एक वेळा आथियाच्या या मैत्रिणींसोबतच त्याने

भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतंच या दोघांच्या लग्नाबाबतही एक मोठे अपडेट समोर आले आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी कधीही उघडपणे प्रेम व्यक्त केले नाही, परंतु दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत.

राहुलला सपोर्ट करण्यासाठी अथिया अनेकदा मैदानात दिसली आहे. याशिवाय, अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत केएल राहुलने आपल्या फलंदाजीची जादू दाखवत नाबाद अर्धशतक झळकावले. समोर आलेल्या माहिती नुसार, 23 जानेवारीला जोडपे लग्न करू शकतात.

त्यांच्या प्रेमकहाणी बद्दल सांगितलं जात की, दोघेही करण जोहरच्या पार्टीत भेटले होते आणि लवकरच दोघे चांगले मित्र बनले. आज जरी अथिया आणि राहुल एकमेकांच्या प्रेमात वेडे असले. तरीही, टीम इंडियाचा स्टार बॅट्समन राहुलच्या अथिया शेट्टीच्या आधीही अनेक गर्लफ्रेंड होत्या हे अनेकांनी ठाऊकही नाही. विशेष म्हणजे, त्यापैकी एक अथिया शेट्टीची खूप जवळची मैत्रिण आहे. तर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल जाणून घेऊया…

 

१. सोनल चौहान :
जन्नत फेम अभिनेत्री सोनल चौहान क्रिकेटची मोठी फॅन आहे. तिने एकदा केएल राहुलचे कौतुक करणारी एक पोस्ट लिहिली. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या अफवा उडू लागल्या. मात्र, सोनल चौहानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्यात अफेअर किंवा डेटिंग असे काहीही नाही आणि ती राहुलच्या चांगल्या खेळाची फक्त फॅन आहे.

 

२. सोनम बाजवा :
केएल राहुल याआधी आयपीएल संघ पंजाब किंग्ज संघाकडून खेळ खेळत होता. त्याने 2 वर्षे संघाचे नेतृत्वही केले. त्याच वेळी केएल राहुलची पंजाबी चित्रपट अभिनेत्री सोनम बाजवासोबत मैत्री झाली. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसले. दोघांनाही आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने हे नाते लवकरच संपुष्टात आले असे म्हटले जाते. मात्र आज देखील त्यांची चांगली मैत्री आहे.

 

३. आकांक्षा रंजन कपूर :
एकेकाळी केएल राहुलचे नाव अथिया शेट्टीच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या आकांक्षा रंजन कपूरसोबतही जोडले गेले होते. अथिया आणि आकांक्षा बालपणीच्या मैत्रिणी आहेत. आकांक्षा आणि राहुल या दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नसले तरी, दोघांना मुंबईत अनेकदा एकत्र पाहिले गेले आहे.

 

४. निधी अग्रवाल :
निधी अग्रवाल आणि केएल राहुल मुंबईतील एका कॅफेमध्ये स्पॉट झाले होते. यानंतर दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्ट लाइक करताना दिसले. लवकरच त्यांच्या अफेअरच्या अफवा पसरल्या आणि राहुल आणि निधी अनेकदा मुंबईत एकत्र दिसले. मात्र, जेव्हा अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या तेव्हा केएल राहुलने ती त्याची शाळेमधील मैत्रीण असल्याचे सांगितले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12