दिसायला ‘हॉ’ट’ आणि ‘बो’ल्ड’ असून देखील ही अभिनेत्री बॉलीवूडमधून अचानक झालीय ‘गायब’, इतक्या वर्षांनी आज ओळखणेही झालेय मुश्किल…

बॉलिवूड असे क्षेत्र आहेत जिथे प्रत्येक वेळी काही का नवीन नवीन घटना ऐकायला मिळतात. अगदी जुन्या काळातील अभिनेते आणि अभिनेत्री देखील सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रसिद्धीस येत असतात. हल्लीच्या नवतरुण अभिनेते आणि अभिनेत्री देखील तितक्याच जोमाने प्रसिद्धीस पात्र ठरत आहे.

परंतु बॉलिवूड असेही क्षेत्र आहेत की जिथे पूर्वीच्या काळातील प्रसिद्धीस पात्र ठरलेल्या अभिनेत्री आणि अभिनेते फ्लॉप झाल्यानंतर अचानक बॉलिवूड मधून गायब झालेत की ज्यांना आज ओळखनेही मुश्किल होऊन बसले आहे. बॉलिवूडमध्ये प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या स्टारच्या भवितव्याबद्दलचा स’ट्टा लागलेला असतो.

एखादा चित्रपट असा असतो की तो रातोरात एखाद्याला स्टार बनवतो आणि जर तोच चित्रपट फ्लॉप झाला तर तो सरळ त्या स्टॅरची सर्व मेहनत वाया जाते. जरी फ्लॉप झालेल्या अभिनेत्री चित्रपट सृष्टी पासून दूर गेल्या असतील तरी देखील बऱ्याचश्या अभिनेत्री अशा आहेत की त्या चाहत्यांच्या सं’पर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया चा पुरेपूर वापर करून घेतात.

कुणाचं नशीब कधी बदलेल याचा काही भरोसा नसतो. २००५ साली ‘सरकार’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रियंका कोठारी हिच्या नशिबाने देखील अशीच पलटी मा’रली. असेच एक वळण घेतले की लोकांनी तिला काही काळानंतर विचारणे बंद केले. ‘जेम्स’ अँड ‘द कि’लर’ सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी प्रियांका आज चित्रपट पडद्यावरून पूर्णपणे गायब झाली आहे.

प्रियंका कोठारीचे खरे नाव निशा कोठारी आहे. तीचा जन्म 30 नोव्हेंबर 1983 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. ‘चढती जवानी मेरी चाल मस्तानी’ च्या रीमिक्स गाण्यामुळे प्रियांकाला चांगली ओळख मिळाली. आर माधवनमुळे 2003 साली तीला जय जय या तामिळ चित्रपटात ब्रे’क मिळाला. राम गोपाल वर्माने तीला हिंदी चित्रपटांमध्ये पहिला ब्रे’क दिला.

ती ‘शिवा’, ‘डरना जरूरी है’, ‘गो’, ‘डार्लिंग’, ‘आग’, ‘अग्यात’, ‘बिल बुलाये बाराती’ या चित्रपटांमध्येही ती दिसली. याशिवाय तिने अनेक तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले पण तिला यातून विशेष ओळख मिळू शकली नाही. 2016 मध्ये प्रियांकाने दिल्लीच्या एका व्यावसायिकाशी लग्न केले. लग्नानंतर तिने पुन्हा एकदा तिचे नाव बदलून अंजली वर्मा ठेवले.

काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या सेलिब्रिटी सॉकर मॅचमध्ये ती दिसली तेव्हा लोकांचा त्यावर विश्वासच बसला नाही. एकेकाळी सडपातळ दिसणाऱ्या निशाने यावेळी खूप वजन वाढवले ​​होते. प्रियांका शेवटच्या वर्षी 2016 मध्ये बुलेट राजा या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट कन्नड आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून खूप दूर गेली. आता ती कधीकधी मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12