आशा भोसले यांच्या नातीला पाहिलंत का ? पहा हॉटनेस आणि सौन्दर्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर…

सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले आहे. खास करून सेलेब्रिटीसाठी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटोज शेअर करत असतात. त्यातूनच त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण होतो.
अगदी बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या या सेलेब्रिटी कायम आपल्या पोस्टमुळे चर्चेत असतात. नुकतंच अजून एक सेलेब्रिटी चर्चेत आली आहे. आपल्या आवाजाने लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
माघील कित्येक दशकापासून आपल्या सुरेल आवाजाने बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या आशा भोसले यांना नव्याने ओळखीची गरज नाही. त्यांनी आपल्या भल्या मोठ्या करियरमध्ये कित्येक सुमधुर गाणी गायिली आहेत. तसे तर आशा भोसले आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची ओळख सर्वाना आहे. मात्र एका खास व्यक्ती बद्दल अनेकांना माहीतच नाहीये.
सध्या ही खास व्यक्ती सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्यक्तीने आपल्या सौंदर्याने अक्षरशः सर्वाना घायाळ केलं आहे. ही व्यक्ती अजून कोणी नसून आशा भोसले यांची नातं जनाई भोसले आहे. स्वित्झर्लंडच्या शाळेत लहानाची मोठी झालेली जनाई संगीत क्षेत्रात करियर बनवू इच्छिते. आजी आशा भोसले प्रमाणेच जनाई देखील एक उत्तम गायिका आहे.
जानाई भोसलेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. जनाईच्या फोटोजने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आशा भोसले यांची नात हिरोईनपेक्षा कमी नाही. जनाई भोसले सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. जनाईचे इन्स्टाग्रामवर 47.9 हजार फॉलोअर्स आहेत.
जनाई केवळ उत्तम गायिकाच नाही तर सौंदर्याच्या बाबतीत थेट बॉलीवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देते. दरम्यान, आशा भोसले यांच्या मुलाचं नाव आनंद भोसले आणि सुनेचे नाव अनुजा भोसले आहे. ज्यांना दोन मुलं आहेत आणि त्यांच्या लहान मुलीचे नाव जनाई भोसले आहे.16 जानेवारी 2002 रोजी जनाईचा जन्म मुंबईत झाला होता.
इंस्टाग्रामवर जनाई अनेकवेळा आपले फोटोज शेअर करत असते. अत्यंत सुंदर असे लांब केस तिच्या सौंदर्यात भर घालते. सिक्स पॅक या प्रसिद्ध संगीत बँडसोबत जनाई काम करते. विशेष म्हणजे हा भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बँड आहे. इतकंच नाही तर आशा भोसले यांची नात जनाई एक उत्तम डान्सरदेखील आहे.
2016 मध्ये तिने बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये एक डान्स शो केला. जनाई एक अष्टपैलू व्यक्ती आहे. कारण कलाक्षेत्रासोबतच ती बास्केटबॉल खेळाडूही आहे. जनाईने आपल्या सुंदर फोटोने चाहत्यांना वेड लावलं आहे. भारतीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही लूकमध्ये तिने आपले फोटोज शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे जनाई या दोन्ही लूकमध्ये अप्रतिम अशी दिसत आहे. जनाई भोसलेने आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. सध्या जनाईचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडियोमध्ये जनाई तिची आजी आशा भोसले यांच्यासोबत ‘तू तू है वही दिल ने जिस अपना कहा’ गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडियो बघून अनेकाजण तिचे फॅन बनले आहेत.