आलिया बिपाशाला बघून ‘या’ अभिनेत्रीला व्हायचंय प्रेग्नंट; म्हणाली; मला आता बाळ पाहिजे पण माझा पती….

बॉलीवूड मधली लग्नसराई संपली आहे. आणि आता त्यानंतर गुडन्यूजचा सपाटा सुरू झाला आहे. सर्वात पहिले अभिनेत्री आलिया भट्टने गरोदर असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यासोबत शेअर केली. त्यानंतर आता तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नसीचा ग्लो पाहायला मिळत आहे.

आलिया भट्टच्या पाठोपाठ अभिनेत्री बिपाशाने देखील ती गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली. सोबतच अभिनेत्री राणी मुखर्जी देखील दुसऱ्यांदा आई होणार आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलीनासुद्धा प्रेग्नन्ट आहे. इतक्या सर्व आनंदाच्या बातम्यांमध्ये अजून एक गुडन्यूज समोर येत आहे. लवकरच अजून एका अभिनेत्रीने लवकरच आई होणार असल्याचे सांगितले आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपल्या सुंदर अशा स्माईलने अनेकांची मन जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या आई बनायच्या तैयारीत आहे. ‘गुम है किसीके प्यार में’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेने सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मालिकेत आता हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. या मालिकेत पाखीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या शर्मा मुख्य भूमिकेत आहे.

ज्यामध्ये ती नकारात्मक भूमिकेत दिसली होती. या मालिकेत अभिनेत्रीने आईची भूमिका साकारली आहे. आईची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्रीने आई होण्यास तैयार आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. सध्या तिचे हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हे सांगितले, त्यानंतर तिचे वक्तव्य पाहून ती चर्चेत आली.

ऐश्वर्या शर्मा नुकतेच इंडिया फोरमशी बोलताना तिच्या मनातील ईच्छा बोलून गेली. अभिनेत्री म्हणाली, तिला सेटवर आरिया आणि तन्मन ऋषी खूप आवडतात. अनेकवेळा त्यांची आई असल्यासारखच वाटत. अस का होतय हे मला माहित नाही, पण आता मला माझे मूल हवे आहे. मात्र आम्ही अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही.

सेटवर मुलांसोबत राहणे मला खूप आवडते. मी त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. याबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, ‘सेटवर माझे विनायक आणि सावीसोबत खूप चांगले बॉन्डिंग आहे. दोघेही खूप गोंडस मुलं आहेत. त्याच्याबरोबर, मी स्वतः लहान होते आणि एकत्र खूप मजा करतो. पडद्यावर आईची भूमिका साकारताना मला कोणतीही अडचण आली नाही. याचे कारण म्हणजे मला मुले आणि त्यांची कंपनी खूप आवडते.’

दरम्यान, या मालिकेत विराटची भूमिका साकारणारा अभिनेता नील भट्ट आणि पाखी म्हणजेच ऐश्वर्या शर्मा दोघांनी गेल्या वर्षी २० नोव्हेंबरला लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. लग्नानंतर हे दोन स्टार्स अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12