आलिया प्रेग्नंट म्हणून रणबीरने शेअर केले त्यांचं बेडरूम सिक्रेट, म्हणाला; ‘बेडवर आलिया माझा…’ लाजेने लाल होत आलीय म्हणाली; ‘नेहमी तूच माझी..’

आलिया प्रेग्नंट म्हणून रणबीरने शेअर केले त्यांचं बेडरूम सिक्रेट, म्हणाला; ‘बेडवर आलिया माझा…’ लाजेने लाल होत आलीय म्हणाली; ‘नेहमी तूच माझी..’

बॉलीवूडमध्ये यंदाचं वर्ष आलिया भट च्या नावे आहे असं बोलायला हरकत नाही. यावर्षी आलिया सुरुवातीपासूनच चांगलीच चर्चेत आली आहे. गंगुबाई काठीयावाडी, RRR, डार्लिंग आणि आता ब्रह्मास्त्र असे एकापाठोपाठ एक आलियाच्या सुपरहिट चित्रपटांची रांगच लागली आहे.

चित्रपट ब्रम्हास्त्रला बॉयकॉट बॉलीवूड ट्रेंडचा सामना करावा लागला असला तरीही चित्रपट मात्र सुपरहिट ठरला आहे. हळूहळू चित्रपटाची गाडी गडगंज कमाईकडे वळत आहे. चित्रपटाचे व्ही एफ एक्स आणि काम बघून अनेक जण बॉलीवूडचं कौतुक करत आहेत. बऱ्याच काळानंतर ब्रह्मास्त्र सारखा जबरदस्त चित्रपट बॉलीवूड मध्ये बघायला मिळाला.

त्यामुळे देखील या चित्रपटाचा बोलबाला सगळीकडे पाहायला मिळत आहे. सोबतच आलिया आणि रणबीर दोघांची जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकली आहे. याच चित्रपटाच्या दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं आता तर आलिया प्रेग्नेंटही आहे. सध्या सगळीकडेच ब्रह्मास्त्र चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे.

त्याच पार्श्वभूमीवरती रणबीर आणि आलिया दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देखील देत आहेत. अशाच एका मुलाखती दरम्यान रणबीर कपूरने मोठा खुलासा केला. विशेष म्हणजे रणबीर कपूरने यावेळी त्याच्या बेडरूम मधील खुलासा केला आहे. त्याने हा खुलासा केल्यानंतर खुद्द आलिया भट देखील चांगलीच लाजल्याचं पाहायला मिळालं.

त्याचं झालं असं की, ब्रह्मास्त्र चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न रणबीर कपूरला विचारण्यात आला. त्यावेळी रणबिर कपूर म्हणाला, ‘ब्रह्मास्त्र चित्रपट मला आणि आलीयाला रात्रभर झोपू देत नाही’ हे उत्तर ऐकताच आलिया देखील चांगलीच हसली. त्यात पुढे रणबीर म्हणाला , ‘अनेक वेळा मी आणि आलिया रात्रभर बसून ब्रह्मास्त्र 2 आणि 3 चा विचार करत बसतो.

या चित्रपटांमध्ये पुढे काय होणार याबद्दलची उत्सुकता आम्हाला देखील रात्र रात्रभर झोप येऊ देत नाहीये. पहिल्या भागामध्ये आमचं काम समाधानकारक आहे. चाहत्यांना आमचं काम आवडलं यावरून दुसरी कोणतीच मोठी गोष्ट आमच्यासाठी नाही. परंतु ब्रह्मास्त्र 2 आणि ब्रह्मास्त्र 3 मध्ये मी आणि आलिया कोणती भूमिका पार पाडणार याकडे आमचं लक्ष लागलं आहे.

रात्रभर मी आणि आलिया चित्रपटाच्या स्टोरीमध्ये पुढे काय होणार याची चर्चा करतो. आणि ज्यावेळी आम्हाला पुढे काय होणार सुचत नाही त्यावेळी रात्री किती वाजले आहेत याचा विचार देखील न करत अयान मुखर्जीला फोन करतो. त्यामुळे आता अयान देखील झोपताना फोन सायलेंटवर करून झोपत आहे.’

त्याच्या या उत्तरानंतर एकच हशा पिटली. दरम्यान ब्रह्मास्त्र चित्रपटाला चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. ब्रह्मास्त्र 2 मध्ये बॉलीवूडची सुपरहिट जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह झळकणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र चित्रपटाच्या मेकर्स कडून याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.