आलियाच्या ‘या’ गाण्यावर मुकेश अंबानीच्या सुनेने केला जबरदस्त डान्स, Video सोशल मीडियावर व्हायरल..

आलियाच्या ‘या’ गाण्यावर मुकेश अंबानीच्या सुनेने केला जबरदस्त डान्स, Video सोशल मीडियावर व्हायरल..

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा जल्लोषाचे वातावरण आहे. त्यांच्या घरात पुन्हा आनंदाने दार ठोठावले आहे. मोठ्या मुलापाठोपाठ आता मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले आहे.

अनंतने राधिका मर्चंटला आपली जीवनसाथी म्हणून निवडले आहे. अंबानी घराण्याची ही सून सामान्य नसून एका नावाजलेल्या आणि मोठ्या कुटुंबातील आहे. राधिका मर्चंट एन्कोर हेल्थकेअरची सीईओ आहे आणि अब्जाधीश उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची एकुलती एक मुलगी आहे.

राधिकाचा जन्म १८ डिसेंबर १९९४ रोजी झाला. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे दोघेही बालपणीचे मित्र आहेत. नीता अंबानी यांची नवी सून राधिका मर्चंटलाही त्यांच्याप्रमाणेच नृत्याची खूप आवड आहे. तिने 8 वर्षांपासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. यासोबतच राधिकाने मुंबईतील श्रीनिभा आर्ट्समधून भारतीय शास्त्रीय नृत्य शिकले आहे.

राधिकाच्या डान्स गुरूचे नाव भावना ठकार आहे. नृत्याव्यतिरिक्त तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये बॅचलर पूर्ण केले. राधिकाला अनेकदा अंबानी कुटुंबाच्या पार्ट्यांमध्ये पाहिले गेले आहे. सध्या सोशल मीडियावर आणि न्यूज मध्ये केवळ राधिका आणि अनंतच्याच बातम्या पहायला मिळत आहेत.

सगळीकडेच त्याचे फोटोज आणि व्हिडियोज वायरल होत आहेत. मंगळवारी राधिकाचा मेंहदी सोहळा जोरदार पार पडला. सोशल मीडियावर देखील राधिकाच्या मेहंदी सोहळ्याने चांगलीच रंगत आणली होती. या सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

यावेळी राधिका मर्चंटने आपल्या मेंहदी सोहळ्यासाठी खास आणि हटके अशा गुलाबी रंगाचा आकर्षक डिझायनर लेहेंगा घातला होता. या आऊटफीटमध्ये राधिका कमालीची सुंदर होती. राधिकाने घातलेली ज्वेलरी देखील प्रमुख आकर्षणाचे कारण ठरली. या सर्व लूकमध्ये तिचं रुप अधिकच खुलून दिसतं होतं.

या सोहळ्यात राधिकाने बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या ‘कलंक’ चित्रपटातील ‘घर मोहे परदेसिया’ या गाण्यावर नृत्यू केलं. राधिका सुरुवातीपासूनच एक उत्तम नृत्यांगणा आहे. त्यामुळे सहाजिकच या गाण्यावर तिने खूप छान डान्स केला. मात्र तिचा पूर्ण लूक आणि हावभाव यामुळे राधिकाचा डान्स खूपच उत्तम ठरला आहे.

या सोहळ्याचे प्रत्येक फोटो आणि व्हिडीओ सासू नीता अंबानी यांनी त्यांचा अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गेल्याच महिन्यात साखरपुडा पार पडला होता. आणि त्यानंतर मुंबईमध्ये एका ग्रँड पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनंत अंबानी आणि राधिका गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आणि आता दोघेही विवाह बंधनात अडकत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12