‘आर माधवनने’ सांगितला ‘रंग दे बसंती’ मधील कि’स्सा, म्हणाला, सोहाला ‘कि’स’ करताना ‘सैफ’ अली खानने मला..’

कधी कधी एखादा सिनेमा, असा बनतो की वर्षानुवर्षे त्याचा चाहतावर्ग कायम राहतो. बॉलीवूडमध्ये असे अनेक सिनेमा आहेत, जे खूप जुने आहेत मात्र आजही त्या सिनेमांचा भलामोठा चाहतावर्ग आहे. श्री ४२०, आराधना, काश्मीर की केली, बॉबी, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, हम आपके है कौन, अंदाज अपना अपना असे अनेक सिनेमा आहेत जे आजही प्रेक्षक आनंदाने बघतात.
असे सिनेमा बनवताना घडलेले किस्से देखील तसेच असतात. रंग दे बसंती हा देखील तसाच एक सिनेमा आहे. या सिनेमाला रिलीज होऊन १५ वर्ष होऊन गेली. मात्र आजही या सिनेमाचे लाखो चाहते आहेत. देशभक्ती, राजकारण, आणि तरुण या सर्वांची उत्तम सांगड घातलेला हा सिनेमा आजही, खू’न चला आणि लुक्का छुप्पी गाण्याच्या वेळी, प्रेक्षकांना रडवतो.
तर, डीजे आणि त्याच्या मित्रांची धम्माल प्रेक्षकांना खळखळून हसवते. कॉलेजच्या कॅम्पस मधून सुरु झालेला हा सिनेमा कधी, देशाच्या राजकारणाच्या वर्तुळात शिरतो हे समजतच नाही. या सिनेमाच्या कास्टिंगच्या वेळी अनेक मोठाल्या अभिनेत्यांना ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला. आर माधवन याने फ्लाईट लेफ्टनंट अजय राठोडची भूमिका यामध्ये साकारली होती.
मात्र तो या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हता. या पात्रासाठी पहिले शाहरुख खान याला ऑफर देण्यात आली होती. मात्र अमीर आणि त्याचा सुरुवातीपासून वाद असल्यामुळे त्याने ते पात्र करण्यास नकार दिला. आणि त्याच्या जागी आर माधवनला ही संधी मिळाली, आणि त्याने देखील या संधीचे सोने केले.
या सिनेमामधून हरवत चाललेल्या आर माधवनच्या करियरला पुन्हा नव्याने सुरुवात झाली. एक रोमँटिक देशभक्त, ही भूमिका त्याने खूपच उत्तम प्रकारे साकारली. सोहा अली खान आणि त्याची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्या दोघांच्या जोडीचा वेगळा असा खास चाहतावर्ग आहे. त्यामध्ये आपल्या गर्लफ्रेंड सोहा म्हणजेच सोनियाला अजय राठोड प्रपोज करतो आणि मग सुंदर असं रोमँटिक गाणं आहे.
ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘तू बिन बतायें, मुझे ले चल कही’ आजही हे गाणे सर्वोत्तम रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे. याच गाण्यामध्ये अजय आणि सोनिया यादोघांचा एक किस आहे. त्याबद्दल साहजिकच राकेश ओमप्रकाश मेहरा आणि माधवनची आधीच चर्चा झाली होती. सोहा अली खान म्हणजे सैफ अली खानची बहीण. रेहाना है तेरे दिलमे या सिनेमामध्ये आर माधवन आणि सैफने सोबत काम केले आहे.
त्यामुळे माधवन सैफच्या स्वभावाला ओळखून होता. सैफच्या बहिणीला किस करायचं, म्हणजे मोठं टेंशन त्याला त्यावेळी आल होत. ‘मला दोन दिवस झोप नाही आली, आणि अखेर आम्ही कॅमेरा ट्रीकने किसचा सिन पूर्ण करण्याचे ठरवले,’ असं माधवनने सांगितले आहे. त्यावेळी, जरी कॅमेरा ट्रीकने तो सिन पूर्ण केला असला, तरीही त्या गाण्यामध्ये तसे काही जाणवले नाही. आजही या सुंदर आणि रोमँटिक गाण्याच्या तोडीचे गाणे कमीच आहेत.