आर. माधवनच्या लेकाने करून दाखवला मोठा कारनामा, फोटो पाहून कराल कौतुक…

बॉलिवूडच्या झगमगत्या चंदेरी दुनिया मध्ये कोणीही हरवून जाईल. सततच्या होणाऱ्या आलिशान पार्ट्या, ट्रिप्स आणि इतर सर्व प्रकार यामुळे हे सेलिब्रेटी अनेक वेळा चुकीच्या मार्गाला देखील जातात. अशा वेळी स्वतःला सांभाळून आपला साधेपणा जपणे सर्वात अवघड असते.
आणि यामध्ये काही सेलिब्रिटींना यश देखील आले आहे. या ग्लॅमरच्या झगमगत्या कृत्रिम जगात अनेकांनी स्वतःचा साधेपणा जपत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या खास सवयीमुळे, एका वेगळा आणि मोठा चाहतावर्ग देखील आहे. आपला हाच साधेपणा ते आपल्या मुलांना देखील देतात आणि त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होते.
या काही मोजक्या सेलेब्रिटींमध्ये भारतीय मनोरंजन सृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता आर माधवनचे नाव नक्कीच पुढे येईल. अलीकडेच आर माधवनपेक्षा त्याचा मुलगा वेदांत याची सगळीकडे चर्चा होती. वेदांतने आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सगळ्यांचीच मने जिंकली. त्याची कामगीरी बघून चाहत्यांनी देखील त्याला भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्या होत्या.
मागच्या वर्षी वेदांत १६ वर्षांचा झाला. ‘ज्या गोष्टींमध्ये मी पुढे होतो त्या सर्व गोष्टींमध्ये मला मागे टाकल्याबद्दल धन्यवाद. तुझ्यामुळे कायमच माझी छाती गर्वाने मोठी होते. मी दरवेळी तुझ्याकडून नवं काही शिकतो, तू चांगला माणूस बनशील अशी मला आशा आहे. मला इतके भाग्यवान बनवल्याबद्दल एक बाप म्हणून मी तुझे आभार व्यक्त करतो,’ असं पोस्ट करत आर माधवनने आपल्या मुलासाठी मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.
आता पुन्हा एकदा वेदांतचे सगळीकडे कौतुक होत आहे. त्याने केलेल्या कामगिरीमुळे त्याच्या आई-वडिलांसह पूर्ण देशाचे नाव उंचावले आहे. माधवनचा मुलगा वेदांत हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. यापूर्वीही त्यानं अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करत पदकांची कमाई केलीय. आता पुन्हा एकदा त्याची चर्चा होतेय.
‘खेलो इंडिया’ युथ गेममध्ये वेदांतनं पाच सुवर्ण पदकं, तसंच दोन रोप्य पदकांची कमाई केली आहे. हा क्षण माधवनसाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. मुलाच्या या यशावर आर. माधवनच्या आनंदाला पारावार उरला नाही. सोशल मीडियावर सर्व खेळाडूंच्या विजयाचे अभिनंदन करताना त्याने मुलगा वेदांतसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आर माधवनने ट्विटरवर मुलगा वेदांतचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो गळ्यात पदक आणि हातात ट्रॉफी धरलेला दिसत आहे. यासोबतच अभिनेत्याने हेही सांगितले की वेदांतने कोणत्या स्पर्धांमध्ये कोणते पदक जिंकले. आर माधवनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘वेदांतने १०० मीटर, २०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले, तर ४०० मीटर आणि ८०० मीटर जलतरणात रौप्यपदक जिंकले.
दुसर्या ट्विटमध्ये आर माधवनने लिहिले आहे की, एक ट्रॉफी मुलांनी स्विमींगमध्ये तर दुसरी संपूर्ण खेलो गेम्समध्ये महाराष्ट्रासाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी. अपेक्षा फर्नांडीस (६ सुवर्ण आणि १ रौप्य) वेदांत माधवन (५ सुवर्ण आणि दोन रौप्य) यांच्या कामगिरीनं कृतज्ञ. असं माधवननं म्हटलं आहे. तर पुढं तो म्हणतो की,प्रदीप सरांचे अथक प्रयत्न आणि मध्य प्रदेश सरकार यांचे आभार. खूप आनंदी आणि अभिमान आहे, असं त्यानं म्हटलं आहे.
यावर्षी झालेल्या ‘खेलो इंडिया युथ गेम्स’मध्ये वेदांतने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. महाराष्ट्र संघाने ही स्पर्धा जिंकून करंडक पटकावला. याशिवाय या संघाच्या मुलांनी जलतरणातही करंडक पटकावला. आर. माधवनचा मुलगा वेदांतही जलतरणपटू आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत त्याने १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये राष्ट्रीय विक्रम केला होता.
सिनेतारकांची मुले केवळ चित्रपटातच करिअर करण्याला प्राधान्य देतात, असे सामान्यतः दिसून येते. पण वेदांतने स्वतःची एक ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे वेदांतचे स्वप्न असून या दिशेने तो अनेक वर्षांपासून काम करत आहे. आर माधवननेही वेदांतला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांना आनंद आहे की त्यांचा मुलगा केवळ देशालाच नव्हे तर अभिनय आणि चित्रपटांव्यतिरिक्त इतर जगातही नाव मिळवून देत आहे.