आर्चीच्या वडिलांनी सांगितले तिचे लहानपणीचे ‘गुपीत’, म्हणाले लहानपणी आर्ची…

आर्चीच्या वडिलांनी सांगितले तिचे लहानपणीचे ‘गुपीत’, म्हणाले लहानपणी आर्ची…

‘सैराट’ या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवल्याचा आता इतिहास झाला आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला चित्रपट कसे बनवायचे याचा पायंडा घालून दिला आहे. नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचला होता.

देश-विदेशात हा चित्रपट मोठ्या प्रमाणत पाहिला गेला. परदेशात देखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर देखील आपली मोहर उमटवली होती. या चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरु हीला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.

या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. त्यानंतर या चित्रपटाचा रिमेक देखील करण्यात आला होता. या चित्रपटात श्रीदेवीची मुलगी जानवी कपूर ही दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. सैराट चित्रपटानंतर आर्चीला चांगल्या चांगल्या ऑफर येऊ लागल्या होत्या.

तसेच तिने काही चित्रपटात देखील काम केले. सैराट चित्रपटात ती पंधरा वर्षाची होती आणि ती इयत्ता सातवीमध्ये होती. सातवीमध्ये असताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला एका कार्यक्रमात पाहिले होते. त्यानंतर त्यांनी तिच्या वडीलाकडे म्हणजेच महादेव राजगुरू यांना रिंकूच्या चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा केली होती.

त्यानंतर राजगुरू यांनी मंजुळे यांना होकार दिला होता. त्यानंतर सैराट चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. आपल्या लाडक्‍या लेकीच्या आठवणीविषयी महादेव राजगुरू यांनी उजाळा दिला आहे. रिंकूचे वडील महादेव राजगुरु हे शिक्षक आहेत. तसेच रिंकूची आई देखील शिक्षिका आहे. रिंकूबाबत बोलताना महादेव राजगुरू म्हणाले की, मी आणि माझी पत्नी दोघेही नोकरी करतो.

त्यामुळे आम्हाला सहाजिकच लहानपणी रिंकूकडे लक्ष देता आले नाही. मात्र, रिंकू ही ध्येयवेडी आणि बोलकी आहे. तिने एखादी गोष्ट करायचे ठरवले की नक्कीच ते पूर्ण करते. रिंकूला नृत्याची देखील आवड आहे. एकदा लहानपणी मी तिला ऑर्केस्ट्रामध्ये घेऊन गेलो असता ती तडक उठून जाऊन स्टेजवर जाऊन नाचू लागली.

त्यानंतर तिला नृत्य करण्याची आवड निर्माण झाली. तसेच रिंकूचे आजोबा हे वाद्य बनवत होते. त्यामुळे देखील तिला वाद्याचा देखील नाद लागला होता. रिंकू राजगुरु हिला एक छोटा भाऊ असून त्याचे नाव सिद्धार्थ आहे. सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघेही घरात सैराट चित्रपटाचे डायलॉग म्हणायचे, असे देखील महादेव राजगुरू यांनी सांगितले आहे.

रिंकूमुळे आम्हाला ओळख मिळाली :- महादेव राजगुरू म्हणाले की, आर्ची या पात्रामुळे आमच्या मुलीला ओळख मिळाली आणि रिंकुमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. आम्ही आज काल कुठेही जातो तर आम्हाला म्हणतात की, हे रिंकू राजगुरुचे आई वडील आले.

एक मुलगी काय करू शकते, याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे रिंकूने.. आमची ती मुलगी आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे, असेही ते म्हणाले. रिंकू ही खाण्यापिण्याची देखील शौकीन असून तिला नॉनव्हेज आवडत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सध्या रिंकू आहे घरीच :- देशभर मधील लॉक डाऊन असल्यामुळे रिंकू राजगुरू सध्या घरीच आहे. ती सध्या आपले विविध छंद जोपासत असून आता पुढे काय करायचे याबाबत देखील तिच्या डोक्यात विचार सुरू असल्याचे सांगण्यात येते. सध्या तिच्याकडे काही चित्रपटांच्या ऑफर देखील असल्याचे कळते. त्यामुळे लवकरच आपल्याला रिंकू पुन्हा एकदा चित्रपटात दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12