‘आर्ची’ची सैराट चित्रपटातील आई खर्‍या आयुष्यात आहे बोल्ड आणि ब्युटीफूल..

सैराट या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक व्याख्या बदलून टाकल्या. सैराट चित्रपट मराठी चित्रपट सृष्टी मध्ये 100 को’टीचा गल्ला करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची उडाणे घेतली. मराठीमध्ये हा चित्रपट यशस्वी झाल्याने हिंदी मध्ये देखील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली.

हिंदीमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या चित्रपटात दिसले. हिंदीमध्ये या चित्रपटाचे नाव धडक असे ठेवण्यात आले होते. हा चित्रपट देखील लोकप्रिय ठरला होता. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. आता सैराट चित्रपटातील आर्चीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री ही सोशल मीडियावर सध्या प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे.

कारण की सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर झाले आहेत. त्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. सैराट चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे. प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांची मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ख्याती आहे. आता नागराज मंजुळे यांचा झुंड हा चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.

हिंदीमध्ये हा त्यांचा पहिला चित्रपट असेल. महानायक अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. झोपडपट्टीतील मुलं फुटबॉलचे मैदान गाजवतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून देखील नागराज मंजुळे यांना खूप अपेक्षा आहेत.

को’रोना म’हामा’रीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर पडले होते. तसेच प्रदर्शनही लांबणीवर पडले होते. मात्र, हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे. त्याला लाखो व्ह्यू मिळाले आहेत.

सैराट चित्रपटामध्ये एक ग्रामीण बाज कथा दाखवण्यात आली होती. एका खालच्या जातीतील मुलाचे उच्च जातीतील मुलीशी प्रेम होते. त्यानंतर ते दोघे पळून जाऊन लग्न करतात, अशी साधी कथा या चित्रपटाची होती. असे असले तरी या चित्रपटाचे संगीत यामुळे हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. नागराज मंजुळे हे आपल्या वेगळ्या चिञपटांमुळे जाणले जातात. त्यांनी मराठीमध्ये पिस्तुल्या, फॅन्ड्री यासह इतर चित्रपटाची दिग्दर्शन केले आहे.

सैराट चित्रपटात आर्चीच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झालेली आहे. या चित्रपटात आर्चीच्या आईची भूमिका भक्ती चव्हाण या अभिनेत्रीने केली होती. भक्ती चव्हाण या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी याआधी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. भक्ती चव्हाण यांनी याआधी एक मराठा लाख मराठा, तुला पण बाशिंग बांधायचं, कॉपी, वंटास, तू माझा सांगती, घेतला वसा टाकू नको यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

भक्ती चव्हाण यांनी नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांचे फोटो अतिशय ग्लॅमरस आणि हॉ’ट असे आहेत. या फोटोमध्ये त्या अतिशय जबरदस्त अशा दिसत आहेत. त्यांच्या फोटोवर अनेकांनी त्यांनी कमेंट देखील केलेले आहेत. सैराट चित्रपटातील ही आर्चीची आई वाटतच नाही, असे देखील अनेकांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12