‘आयपीएल’मध्ये पैशाचा पाऊस ! पण वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ खेळाडूवर 250 रुपये रोजंदारीवर काम करण्याची वेळ..

‘आयपीएल’मध्ये पैशाचा पाऊस ! पण वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ‘या’ खेळाडूवर 250 रुपये रोजंदारीवर काम करण्याची वेळ..

भारताने ऑलम्पिकमध्ये चांगली कामगिरी केल्याने ऑलम्पिकच्या खेळाडूंची खूपच चर्चा झाली होती, तर दुसरीकडे गोल्ड मेडल मिळवणारा नीरज चोप्रा याचीही खूपच चर्चा सुरू आहे. त्याने भालाफेक मध्ये गोल्ड मेडल मिळाल्यानंतर त्याला जवळपास 13 को टी रु’पयांचे रोख पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इतर पुरस्कारानेही त्याला गौरविण्यात आले होते.

दरम्यान मोठ्या जल्लोषात आयपीएल सुरु आहे आणि आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. आयपीएल फक्त पै’शाचा खेळ आहे असे आपण म्हणतो, अनेक खळाडूंवर करोडोची बोली लावून त्यांना आपल्या संघात सामील करता येते, तो खेळाडू देशाकडून खेळला तरी आयपीएल मधून तो बक्कळ कमाई करून घेतो.

मात्र, असे असले तरी क्रिकेट मुळे सर्व जाती धर्माचे लोक हे एकत्र येताना दिसतात. भारताचे मुख्य फळीतील क्रिकेट सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर महिलांचे क्रिकेट देखील आता बऱ्यापैकी चर्चेत असते. मात्र, त्या तुलनेत अंध खेळाडूंचे क्रिकेट हा दुर्लक्षितच विषय आहे.

मात्र 2018 मध्ये भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या अंध क्रिकेट संघातील एक खेळाडू आज दुर्लक्षित आहे. आज आम्ही आपल्या त्याच याबाबतची माहिती देणार आहोत. अंध क्रिकेटची सुरुवात गेल्या काही वर्षापासून भारतामध्ये झालेली आहे. दि’ व्यांग क्रिकेट संघाची देखील आपल्याकडे सुरुवात काही वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. मात्र, अंध क्रिकेट स्पर्धा ही काही औरच असते.

केवळ अंदाज घेऊनच खेळणे असे याचे वैशिष्ट्य असते. अंध क्रिकेट पटूच्या संघांमध्ये क्रिकेट खेळताना चेंडूला घुंगरू लावण्यात येतात. जेणेकरून गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर फलंदाज पर्यंत तो जाताना आवाज आला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याला दिशा देखील कळली पाहिजे. त्यानंतर फलंदाज तो चेंडू टोलाऊन लावून लावतो.

गेल्या काही वर्षात अंध क्रिकेट संघाने देखील खूप मोठी वावाह मिळवली आहे. मात्र, असे असले तरी या क्रिकेट संघातील खेळाडू कायम दुर्लक्षितच राहत असल्याचे दिसत आहे. 2018 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप संघामध्ये एक खेळाडू सहभागी झाला होता. मात्र, त्याला आता रोजंदारीवर काम करावे लागत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूचे नाव नरेश तुमदा असे आहे.

तो ने’त्रहीन क्रिकेट वर्ल्डकप मध्ये खेळला होता आणि त्याने चांगली कामगिरी करत भारताला जिंकून देखील दिले होते. नरेश हा गुजरातच्या नवसारी येथील रहाणारा आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला अनेकांनी विचारले. मात्र, काही दिवसानंतर त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. 2018 मध्ये शारजामध्ये झालेल्या पा’किस्ता’न वि’रोधातील सामन्यांमध्ये 308 धावांचे लक्ष भेदताना त्याने देखील मोलाची कामगिरी बजावली होती.

आता त्याला रोजंदारीवर केवळ 250 रु’पयांवर काम करावे लागत आहे. याबाबत त्याने अनेकदा मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिले आहे की, माझ्यासाठी आपण काही करा, मला मदत करा. मात्र मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देखील काही फायदा झाला नाही. त्याला अजूनही कोणाचीही मदत मिळाली नाही. त्याने अनेक ठिकाणी आपले पुनर्वसन करण्यासाठी विनंती केली. मात्र, त्याचाही काही फायदा झाला नाही, असेही त्याने सांगितले.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.