आपल्या 31 वर्षाच्या बॉलिवूड करियरमध्ये अजय देवगणने शाहरुख सोबत एकदाही केले नाही काम, कारण वाचून थक्क व्हाल…

शाहरुख आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधली सर्वात आवडती जोडी मानली जाते. हि जोडी जेव्हापण पडद्यावर येते तेव्हा एक वेगळाच माहोल असतो. ह्या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चांगली आहे तितकीच घट्ट मैत्री त्यांची खऱ्या आयुष्यात सुद्धा आहे.
होय, शाहरुख आणि काजोल एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि हि मैत्री गेल्या २५ वर्षांपासून कायम आहे. परंतु चकित करण्यासारखी गोष्ट म्हणजे शाहरुख खान आणि काजोलचा पती अजय देवगण ह्या दोघांमध्ये तशी खास काही मैत्री नाही.
शाहरुख खान आणि अजय देवगण ह्यांच्यामध्ये सुरुवातीपासून मैत्री नव्हती. एकेकाळी ह्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. नंतर असे काही झाले कि दोघांची हि मैत्री तुटली. तर आजच्या ह्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत केव्हा शाहरुख आणि अजय चांगले मित्र होते, ३० वर्षांच्या करियरमध्ये दोघांनी एकत्र एकही सिनेमा का केला नाही, आणि कशी ह्या दोघांची मैत्री तुटली. चला तर जाणून घेऊया..
वर्ष १९९५ सालची ही गोष्ट आहे, तेव्हा राकेश रोशन हे करन अर्जुन चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्यांचा शोध घेत होते. करन अर्जुन चित्रपटासाठी राकेश रोशन ह्यांनी अगोदर सनी देओल आणि अजय देवगण ह्यांना साईन केले होते. परंतु काही कारणास्तव सनी देओलने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
त्यानंतर राकेश रोशन ह्यांनी शाहरुख खान आणि अजय देवगण ह्या दोघांना चित्रपटासाठी फायनल केले होते. परंतु चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर अजय देवगणला वाटले कि अश्या प्रकारच्या भूमिका त्याने इतर चित्रपटात केल्या आहेत.
त्यामुळे अजय देवगणने राकेश रोशन यांच्याकडे मागणी केली की दोघांच्या भूमिकेची अदलाबदल करावी. म्हणजेच चित्रपटात जी भूमिका शाहरुखला दिलेली होती ती अजयला हवी होती आणि अजयची भूमिका शाहरुखला द्यावी. परंतु दिग्दर्शक राकेश रोशन ह्या गोष्टीसाठी तयार नव्हते.
यानंतर शाहरुख खान आणि राकेश रोशन ह्यांच्यात सुद्धा थोडे वा’द होऊ लागले. शेवटी शाहरुख आणि अजय देवगणने दोघांनी चित्रपटासं-बं’धी निर्णय घेण्यासाठी एक मिटिंग घेतली. यामध्ये दोघांनी निर्णय घेतला कि ते दोघे एकत्र हा चित्रपट सोडतील. यानंतर अजय देवगणने त्यानंतर करन अर्जुन चित्रपट सोडला.
परंतु एक महिन्यानंतर अजय देवगणला माहिती पडले कि शाहरुखने वचन दिले होते कि तो सुद्धा हा चित्रपट सोडणार, पण त्याने हा चित्रपट सोडला नाही. तो अजूनही या चित्रपटात आहे. हे समजल्यावर अजयला शाहरुखचा चांगलाच राग आला.
हेच ते कारण आहे, ज्यामुळे शाहरुख आणि अजय देवगण जवळजवळ ३० वर्ष बॉलिवूडमध्ये आहेत, परंतु तरीसुद्धा हे दोघे एकत्र कोणत्याच चित्रपटात दिसले नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काजोल ह्या दोघांचीही खास आहे. असे असूनही त्या दोघांमध्ये मैत्री होऊ शकली नाही.
दोघांनी मैत्री करावी म्हणून काजोलने सुद्धा कधीच दोंघांवर दबाव टाकला नाही. २०१२ हे साल होते जेव्हा दोघांमधील भांडण सर्वांसमोर आले होते. ही वेळ होती जेव्हा अजय देवगणचा चित्रपट सन ऑफ सरदार रिलीज होत होता. अगदी त्याच दिवशी शाहरुखचा जब तक है जान हा चित्रपट रिलीज झाला.
दोघांचे चित्रपट एकमेकांवर भारी पडले. चित्रपट एक्स्पर्ट्सचे म्हणणे होते जर हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या दिवशी रिलीज झाले असते तर कदाचित दोन्ही चित्रपट अजून चांगला व्यवसाय करू शकले असते. त्यावेळी अजय देवगणने आ-रो’प लावला होता कि यशराजने आपली प्रतिष्ठा आणि ताकदीचा उपयोग करून शाहरुखच्या जब तक है जान चित्रपटासाठी जास्त स्क्रीन्स विकत घेतले.
ज्यामुळे त्याच्या सन ऑफ सरदार चित्रपटाला जास्त स्क्रीन्स मिळू शकले नाहीत. ज्यामुळे चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहचू शकला नाही. ह्यानंतर २०१६ ला सुद्धा पुन्हा एकदा शाहरुख आणि अजय देवगण बॉक्सऑफिसवर एकमेकांच्या समोरासमोर आले. शाहरुखचा ए दिल है मुश्किल चित्रपट रिलीज झाला होता.
अगदी त्याच दिवशी अजय देवगणचा शिवाय चित्रपट रिलीज झाला. जरी दोन्ही चित्रपटाने बॉक्स ऑफिस जास्त चांगला व्यवसाय नाही केला. हेच कारण आहे कि ह्या दोघांनी आजपर्यंत एकही चित्रपट एकत्र केला नाही. शाहरुख आणि काजोलची एक चांगली केमिस्ट्री आहे. परंतु जर अजयची सुद्धा शाहरुख सोबत चांगली मैत्री असती तर हे तिघे मिळून बॉलिवूडचा एक चांगला चित्रपट बनवू शकले असते.