आपल्या अभिनयाने ही लहानशी ‘चि’मुरडी’ मराठी चित्रपट सृष्टीवर करतेय राज, पहा बॉलीवूडला देखील आपल्या अदांनी लावलेय वेड…

आज मराठी चित्रपट सृष्टीतील एक चमकता चेहरा म्हटले कि अभिनेत्री पूजा सावंतचे नाव आपल्या डोळ्यासमोर येते. २५ जानेवारी १९९० ला पूजाचा जन्म झाला. पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची ३० वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले आहे तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले आहे आणि तिला तिच्या वडिलांकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला. असे पूजा नेहमी सांगत असते चला तर मग आज आपण पूजा सावंत बद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.

आपणास सांगू इच्छितो कि पूजा सावंतचे शालेय शिक्षण हे दादरच्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ येथून झाले तर महाविद्यालयीन शिक्षण हे वडाळ्याच्या एम आय ई एस महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. पूजाला लहानपणापासूनच नृत्याची भयंकर आवड असल्याने शाळेत आणि महाविद्यालयात असताना तिने अनेक नृत्यस्पर्धा आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आणि अनेक बक्षिसे मिळवली.

पूजाला लहानपणापासूनच प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. पक्षी व प्राण्यांची प्रचंड आवड असल्याकारणाने तिने तिच्या घरीही अनेक प्राणी पाळले आहेत. २००८ साली पूजाने महाराष्ट्र टाइम्स च्या ‘श्रावण क्विन’ या स्पर्धेत भाग घेतला. त्यामध्ये आपल्या प्रखर अभिनय आणि नृत्यकौशल्याने तिने हि स्पर्धा जिंकली.

या स्पर्धेचा जज असलेल्या सचित पाटील याने पूजाचा अभिनय पाहून तिला आपल्या आगामी ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटासाठी विचारणा केली. पूजानेही लगेच होकार कळविला आणि अशा प्रकारे पूजा सावंत चे मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झाले.

त्यानंतर पूजा ने हिंदी रिऍलिटी शो ‘बुगी वूगी’ आणि मराठी टीव्ही शो ‘एकापेक्षा एक – ज’ल्लोष सुवर्णयुगाचा’ या सारख्या शो मध्ये कधी आपल्या अभिनयाने तर कधी नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने ‘वाजले कि बारा’ या टीव्ही शोचे होस्टिंग पण केले. २०१० मध्ये हिंदी चित्रपट ‘तुम मिलो तो सही’ मध्येही एक छोटीशी भूमिका निभावली.

त्यानंतर २०११ मध्ये अंकुश चौधरी सारख्या सुप्रसिद्ध मराठी कलाकारासोबत ‘झकास’ या चित्रपटात उत्कृष्ट भूमिका निभावली. हा चित्रपट २०११ चा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. त्यानंतर पूजा सावंतने ‘सतरंगी रे, सांगतो ऐका, नीलकंठ मास्तर, पोस्टर बॉईज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या भूमिका निभावल्या.

तसेच ‘नीलकंठ मास्तर’ या चित्रपटातील एका गाण्यासाठी तिने नृत्यदिग्दर्शनही केलेले आहे. २०१५ साली पूजा ने चंद्रकांत कणसे यांच्या ‘दगडी चाळ’ या चित्रपटात पुन्हा एकदा अंकुश चौधरी सोबत काम केले. हा चित्रपटही प्र’चंड गाजला. त्यानंतर तिने वृंदावन, ची’टर यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले.

२०१७ साली ‘लपाछपी’ या चित्रपटाची जाहिरात करताना पूजा सावंतचे गरोदर असल्याचे फोटो सर्वच सोशल मीडिया वर व्हायरल झाले होते. चौकशीअंती असे लक्षात आले कि ‘लपाछपी’ या चित्रपटात पूजा ने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली आहे आणि ते फोटो म्हणजे चित्रपटाच्या प्रोमोशनचा एक भाग होता.

मुख्य म्हणजे ‘लपाछपी’ या चित्रपटाला आणि पूजाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे ‘दादासाहेब फाळके पुरस्कार- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ मराठी चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि मोलाचा मानला जातो.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते.

पूजाने नुकताच तिचा लहानपणीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत ती तिच्या आई-बाबांसोबत दिसत आहे. या फोटोत पूजा खूपच क्यूट दिसत असल्याचे तिचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. याच फोटोसोबत तिने तिचा आणि तिच्या आईवडिलांचा त्याच पोझमधला आताचा फोटो शेअर केला आहे.

या फोटोसोबत तिने कॅप्शन लिहिले आहे की, वेळ कशी उडून जाते हेच कळत नाही… मला पुन्हा छोटे बनायचे आहे. तसेच पूजा सावंतचा स्विट अँड सिंपल लूकबरोबच बोल्ड अंदाजही रसिकांना भावतो. त्यामुळे तिच्या या लूकपेक्षा पूजा सावंतच्या हॉट अँड सेक्सी लूकचीच चर्चा जास्त होते.

पूजाचा बॅकलेस साडीमधला बोल्ड लूक असो किंवा मग ‘लपाछपी’ सिनेमाच्यावेळी लंडन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पूजाच्या सेक्सी अंदाज असो, तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच होता. ‘लपाछपी’ सिनेमावेळी सिनेमापेक्षा पूजाच्या त्या लूकचीच जास्त चर्चा झाली होती.

त्यामुळे आता पूजा सावंत कोणत्या कार्यक्रमात येते तेव्हा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांनाच घायाळ करतो. नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार हि गुणी अभिनेत्री आता चक रसेल या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम करत आहे. चक रसेल या दिग्दर्शकाचे ‘द मास्क आणि द स्कॉर्पिअन किंग’ हे गाजलेले चित्रपट आहे.

आणि सध्या ते ‘जंगली’ हा चित्रपट बनवीत आहेत. थायलंड मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु असून या चित्रपटात पूजा सावंत बरोबरच विद्युत जमवाल, अतुल कुलकर्णी, मकरंद देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. २०१९ म्हणजेच यावर्षीच प्रदर्शित होणाऱ्या पूजा सावंतच्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12