आधीच तीन बायका असताना चौथं लग्न करणार साऊथचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता, पहा तिसऱ्या बायकोने रंगेहाथ पकडल्यानंतर चपलेने केली होती धुलाई…

मनोरंजन सृष्टीमध्ये लग्न करणे काही नवीन नाही. अनेक कलाकारांनी खूपच लवकर लग्न करून लवकरच घटस्फोट देखील घेतला आहे तर अनेक कलाकारांनी अनेक लग्न केले आहेत. त्यात आघाडीवर सैफ अली खान आणि अमीर खान आहे. सैफने २ लग्न केले असून त्याला ४ मुलं देखील आहेत.
तर अमीर खान ने तीन लग्न केले असूनही आज तो सिंगल आहे. त्याने गेल्यावर्षीच किरण रावला घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. अमीरने घटस्फोट घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. कारण अमीर आणि किरण रावकडे एक आदर्श जोडी म्हणून बघितले होते होते.
दरम्यान, साऊथमध्ये देखील असा एक अभिनेता आहे ज्याने एक दोन नाही तर तीन बायका केल्यानंतरही आता तो चौथ्यांदा भोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्याचे नाव आहे विके नरेश. विके नरेश हा सुपरस्टार महेश बाबू यांचा सावत्र भाऊ आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांचे पहिले पती कृष्णमूर्ती यांचा तो मुलगा आहे. नरेश हा कायम वा’दग्र’स्त असतो. त्याने देखील अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे. नरेशाचे पहिले लग्न डान्सर मास्टर्स यांच्या मुलीशी झाले होते. त्यानंतर रेखा शास्त्री याच्यासोबतही त्यांनी लग्न केले. नंतर राम्या यांच्याशी त्यांनी लग्न केले.
नरेश बाबू एक अभिनेता सोबत राजकारणी देखील आहे. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये अभिनेते हे राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळतात असे चित्र आपण दिल्या अनेक वर्षापासून पाहत आहोत. नरेश बाबू याचे वैयक्तिक आयुष्य अतिशय वा’दग्र’स्त असे राहिले आहे.
तीन लग्न केल्यानंतर आता तो कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश हिच्या सोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे त्याची तिसरी पत्नी राम्या रघुपती ही चांगलीच भड’कली आहे. हे दोघेही आता गेल्या काही दिवसापासून वेगळेच राहत आहेत.
काही दिवसांपूर्वी हॉटेलमध्ये नरेशला पवित्रासोबत तिसरी पत्नी राम्या हिने रंगे हाथ पकडले. राम्या हिने नरेशवर त्यावेळेस ह’ल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला. तिने चप्पल फे’कून त्याला मा’रण्याचा प्रयत्न तिने केला. मात्र पो’लीस वेळीच घटनास्थळी पोहोचले आणि या दोघांनाही त्यांनी संरक्षणामध्ये बाहेर काढले होते. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
व्ही.के नरेश यांनी शनिवारी जाहीर केले की तो लवकरच कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांचे हे चौथे लग्न असेल. नरेश यांनी ट्विटरवर एक खास व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये कपल केक कापताना आणि एकमेकांच्या ओ’ठांवर चुंबन घेताना दिसत आहे.
नरेश यांनी या व्हिडिओला कॅप्शन दिले, “नवीन वर्ष, नवीन सुरुवात, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, आमच्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.” आयएनएस या वृत्तसंस्थेनुसार, दोघेही बराच काळ एकत्र राहत होते. दोघांनी एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करून लग्नाची घोषणा केली आहे.
नरेश यांनी तिसरी पत्नी रम्या रघुपती हिला घटस्फोट दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. नरेश हा महेश बाबूचा सावत्र भाऊ आहे. त्यांचे लग्न अभिनेत्री विजया निर्मला आणि त्यांचे पहिले पती के.एस. मूर्ती यांचा मुलगा. निर्मलाने तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला आणि सुपरस्टार कृष्णाशी लग्न केले.
New Year ✨
New Beginnings 💖
Need all your blessings 🙏From us to all of you #HappyNewYear ❤️
– Mee #PavitraNaresh pic.twitter.com/JiEbWY4qTQ
— H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) December 31, 2022