“आता हे अति झालं..” रणवीरनंतर बिग बॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केलं न्यू ड फोटोशूट, पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला…

“आता हे अति झालं..” रणवीरनंतर बिग बॉस फेम ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केलं न्यू ड फोटोशूट, पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला…

बॉलीवूडमधील काही सेलिब्रिटी आपल्या बिनधास्त आणि बोल्ड एटीट्यूडसाठी ओळखले जातात. इतर कोणाचीही परवा न करता केवळ आपल्या मनात जे येतं आणि आपल्या चाहत्यांना जे हवं असतं तेच सेलिब्रिटी करतात. त्यामुळे देखील या सेलिब्रिटीचा वेगळा आणि खास असा मोठा चाहतावर्ग बघायला मिळतो.

अशाच बिनधास्त सेलिब्रेटींपैकी एक रणवीर सिंग देखील आहे. अभिनेता रणवीर सिंग आपल्या भन्नाट आणि हटके स्टाईलसाठी सगळीकडे ओळखला जातो. रणवीरने आजवर अनेक वेळा आपल्या फॅशन सेल्सने चाहत्यांना अवाक केल आहे. त्याचा हा फॅशन सेन्स खूपच अतरंगी असून एक वेळा तर त्याने चक्क स्कर्ट घातला होता.

त्यानंतर त्याला खूप जास्त ट्रोल करण्यात आलं होतं. परंतु रणवीर सिंग या सर्व गोष्टींचा जास्त विचार करत नाही आणि कदाचित त्यामुळेच त्याचा खूप मोठा चाहता वर्ग जगभरात पसरलेला आहे. प्रसंगी बघता रणवीर सिंग कधी काय करेल याचा काहीच नेम नाही. मागील काही दिवसांपासून रणवीर सिंग ट्विटरवर ट्रेंडिंग वर आहे.

नुकताच रणवीरने पेपर मॅक्झिन साठी एक खास फोटोशूट केला आहे. हे फोटोशूट इंटरनॅशनल लेवलचं होतं. हे फोटोशूट बघून सगळ्यांना मोठा ध’क्का बसला. याचं कारण की, रणवीरने कोणतेही कपडे न घालता म्हणजेच न्यू ड फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सगळीकडेच या फोटोशूटची चर्चा बघायला मिळत आहे.

अनेकांनी रणवीरला ट्रोल केला आहे तर बऱ्याच लोकांनी त्याच्या या धाडसाचं कौतुक देखील केला आहे. आता रणवीर पाठोपाठ अजून एका अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही न्यू ड फोटो शेअर केले आहेत.

हिंदी ‘बिग बॉस १३’ या कार्यक्रमामुळे असमि रियाज प्रकाशझोतात आला. असिमने न्यूड फोटोशूटचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. पण हे सगळे फोटो आणि व्हिडीओ २०१७मधील असल्याचं त्याने म्हटलं आहे. काही तासांमध्येच त्याचा हा लूक सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. तसेच नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोंवर कमेंट करण्य़ास सुरुवात केली आहे.

या फोटोंमध्ये त्याची शरीरयष्टी पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तसेच असिमचा हा लूक विशेष लक्षवेधी ठरला आहे. असिमने फोटो पोस्ट करताच “हे खूप अति झालं”, “रणवीर सिंगकडून प्रेरणा घेतलीस का?” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी त्याच्या या लूकचं भरभरून कौतुक केलं आहे.

असिम हा ‘बिग बॉस १३’मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला. शेवटच्या स्पर्धकांमध्ये त्याचा सहभाग होता. मात्र, ‘बिग बॉस १३’ चा किताब सिद्धार्थ शुक्लाने पटकावला. विशेष म्हणजे ‘बिग बॉस’नंतरही असिमची लोकप्रिय कायम आहे. त्याने हिमांशी खुराना आणि जॅकलीन फर्नांडिससोबत म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.