आता अनिल कपूरने केली करीनाची पो’लखो’ल, म्हणाला ‘वीर दे वेडिंग’ चित्रपटाच्या वेळी करिनाने कित्येक वेळा…

बॉलीवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर खान सध्या तिच्या प्रे’ग्नंसी चा काळ एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबतच ती तिच्या कामावरही तेवढेच लक्ष ठेवून आहे. करिना तिच्या चॅ’ट शोमध्ये अनेक कलाकारांचे स्वागत करताना दिसत असते. नुकतेच तिने या शोमध्ये बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याला बोलावले होते.
अनिल कपूर यांच्यासोबत सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील उपस्थित होते. यादरम्यान अनेक गं’भी’र मुद्द्यांवर त्यांनी बातचीत केली ज्यामध्ये बॉलीवूडमधील हिरो आणि हिरोईन यांना मिळत असलेल्या फी मध्ये खूप अंतर असलेल्या मुद्द्याचा समावेश होता.
करिना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट्स मध्ये अनिलने आपल्या आयुष्यातील अनेक जुने कि’स्से सांगितले. त्याचसोबत त्याने करिना किती फी घेते याची पोलखोल देखील केली आहे. या शो मध्ये करिनाने अनिल कपूरला विचारले की, हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये पुरुष कलाकारांइतकेच स्त्री कलाकाराला फी मिळत असेल तरच पुरुष कलाकार चित्रपटात काम करायला तयार होतात.
बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील असेच केले पाहिजे असे तुम्हाला वाटते का यावर अनिलने उत्तर दिले की, तू तर माझ्याकडून याआधी खूप मोठी फी घेतली आहेस. यावर करिना लगेचच म्हणाली, आम्ही हीच गोष्ट बदलण्याचा प्रयत्न करत आहे ना.
यापुढे अनिल कपूरने सांगितले की, वीरे दे वेडिंग या चित्रपटासाठी करिनाने जास्त मानधन मागितले होते. हिरोपेक्षा देखील हिरोईन अधिक मानधन मागत असल्याचे इतर निर्मात्यांनीच मला सांगितले होते. मी देखील या चित्रपटाचा एक निर्माता होता.
त्यामुळे करीना जी र’क्कम मागत आहे ती तिला देऊन टाका. असे मी सांगितले होते. वीर दे वेडिंगची निर्मिती अनिल कपूर आणि त्याची मुलगी रिया कपूर, शोभा कपूर आणि एकता कपूर यांनी मिळून केली होती. अनिल कपूरने पुढे हे देखील म्हणले की, स्त्री सहकलाकारापेक्षा कमी मानधन घेण्याविषयी काहीही अडचण नाहीये.
हे अनेकदा झाले आहे. माझे असे अनेक चित्रपट आहेत ज्यामध्ये मुख्य अभिनेत्रीने जास्त पैसे घेतलेत आणि मी आनंदाने दिले आहेत. बॉलिवूडचा अनिल कपूर हा त्याच्या फिटनेस आणि अभिनयामुळे सदैव चर्चेत असतो. सुमारे ४० वर्षांपेक्षाही अधिक काळ अनिल कपूर आपल्या अभियनाने केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करतो आहे.
अनिल कपूर आणि करिना कपूर यांनी टशन, वेबफा यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ते लवकरच करण जोहरच्या तख्त या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
करीना सध्या करन जोहरच्या मल्टीस्टारर तख्त चित्रपटावरही सध्या काम करत आहे. यात अनिल कपूर, विक्की कौशल, रणवीर सिंग, आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट २०२२ च्या सुरवातीस प्रदर्शित होईल अशी बातमी आहे.