‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा होत असताना नागराज मंजुळेंनी सांगितलं, “सिनेमा काढून समाज.”..

‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, ‘झुंड’ चित्रपटाची चर्चा होत असताना नागराज मंजुळेंनी सांगितलं, “सिनेमा काढून समाज.”..

बॉलिवूडचे शहनाशह अमिताभ बच्चन प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘झुंड’ सिनेमा ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट अतिशय चर्चेत होता.

नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यामुळे आणि यामध्ये महानायक बिग बी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटाची सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सैराटची संपूर्ण टीम एकत्र आली. म्हणजे पुन्हा एकदा प्रेक्षकांना आर्ची आणि पारश्याला एकत्र बघितलं.

दरम्यान, अनेक दिग्ग्ज कलाकारांनी चित्रपटाचे खूप कौतुक केले. त्यात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आघाडीवर आहे. त्याने त्याच्या घरी चित्रपटाच्या टीमला बोलावून त्यांचे विशेष कौतुक त्याने केले. त्याचबरोबर चित्रपटाचे कथानक त्याला एवढे आवडले कि त्याने थेट संधी मिळाली तर नागराजच्या चित्रपटात काम करेल अशी ईच्छा बोलून दाखवली.

पुढे तो म्हणाला कि, जे आम्ही गेल्या १५-१६ वर्षात केले नाही ते नागराजने करून दाखवले. दरम्यान, साऊथ सुपरस्टार धनुषने देखील या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले आहे. चित्रपट पाहून तो म्हणाला कि, हा चित्रपट पाहून मी स्तब्द झालोय, चित्रपटातील कलाकारांचे जेव्हडे कौतूक करावं तेवढं कमीच, त्यात महानायक अमिताभ बच्चन यांचा अभिनय देखील उत्तम आहे.

झुंडमुळे नागराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची लेखणी त्यांच्या सिनेमातून स्पष्ट जाणवते. नागराज मंजुळे यांच्यामुळेच मराठी सिनेमा देखील मोठी कमाई करू शकतो हे सिद्द झाले आहेत. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट नंतर झुंड हा नागराज यांचा चित्रपट आहे. यांचे सिनेमे समाजाला अंतर्मुख करणारे असतात. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या तरी आजही तितक्याच ताज्या वाटणाऱ्या प्रश्नावर नागराज मंजुळे यांचे सिनेमे भाष्य करतात.

त्यांच्या झुंड सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. झोपडपट्टीतील मुलं आणि तिथल्या लोकांचं आयुष्य यावर हा सिनेमा बेतलेला आहे. दरम्यान, हा सिनेमा सध्या बॉक्सऑफिस गाजवत असताना नागराज यांनी कविता आणि सिनेमांबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘आतला जाळ मोकळा करत राहावं माणसांनी’, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

तसंच “सिनेमा काढून समाज बदलत नाही,” असंही नागराज म्हणाले. पुणे कविसंमेलनात आणि कविसंमेलनानंतरच्या बैठकीत ते बोलत होते. “जी आत्ता आहे ती संस्कृती हलकट आहे. पण तिचं वय खूप जुनं आहे आणि तुम्ही तिच्याशी जुन्याच श’स्त्रांनी लढताय. कवितेने किंवा सिनेमांनी समाज बदलेल असं तुम्हाला वाटतं. पण लय भाबडे लोक आहात तुम्ही.

तसं काही होणार नाही. पण आपण लढत रहायला हवं. मी कवितेतून किंवा सिनेमातून फक्त मोकळा होत असतो आणि त्याचे पैसेही मिळतात, ही गोष्ट मला खूप नंतर कळली. कवी होणं किंवा दिग्दर्शक होणं ही माझी कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. पण आतला जाळ मोकळा करत रहावं माणसांनी… लय थंडावा मिळतो जिवाला…”, असं नागराज मंजुळे म्हणाले आहेत.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.