आज मलायका आणि अर्जुन सलमान खान मुळेचं एकत्र ! वारंवार सलमानच्या घरी जाऊन अर्जुनने मालायकाच्या..

आज मलायका आणि अर्जुन सलमान खान मुळेचं एकत्र ! वारंवार सलमानच्या घरी जाऊन अर्जुनने मालायकाच्या..

२००० साली, मॅडोनाच्या दुसऱ्या लग्नाची बातमी समोर आली. निर्माता-अभिनेता गाय रिचसोबत तिने दुसरे लग्न केले, आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. त्याचे कारण देखील तसेच होते, लोकप्रिय कलाकार मॅडोनापेक्षा तिचा दुसरा नवरा तब्ब्ल दहा वर्षांनी लहान होता. त्यावेळी केवळ बॉलीवूडच नाही तर, संपूर्ण हॉलीवूड देखील हादरलं होत.

याचे अजून एक कारण होते, मॅडोनाचे जरी ते दुसरे लग्न असले तरी, भल्या मोठ्या कुटुंबातील रिचचे ते पहिलेच लग्न होते. त्यापूर्वी असे नाते खूप क्वचितच बघायला मिळत होते. नात्यामध्ये, मुलगी मोठी असली तरीही ती जास्तीत जस्त तीन ते पाच वर्षांनी मोठी, असं सर्वानी ऐकलं-पाहिलं होत.

मात्र त्यातही ती अविवाहितच असे. पण मडोनाने जेव्हा गाय रिचसोबत लग्न केले तेव्हा तिचा आधीच एक घ’टस्फो’ट झाला होता आणि त्या लग्नामध्ये तिला मुलं देखील होती, सोबतच त्या दोघांमध्ये वयाचे अंतर देखील खूप जास्त होते. पण त्या दोघांनी एका पूर्ण काळ सोबत घालवला, आणि आठ वर्षांनंतर ते वेगळे झाले. आपल्या देशात कधी, कोणी विचार देखील केला नसेल की, अशाच प्रकारचे दृश्य बघायला मिळेल.

मात्र, मलायका आणि अर्जुन या दोघांच्या जोडीने, पुन्हा एकदा दाखवून दिले जेव्हा प्रेम होते, तेव्हा इतर कोणतीच गोष्ट ग्राह्य धरली जात नाही. अर्जुन कपूर आणि मलायका मध्ये १२ वर्षांचे अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा १२ वर्षांनी मोठी असून तिचा घ’टस्फो’ट झालेला आहे. मात्र त्यांची ही प्रेमकथा दिसते तेवढी साधी नाहीये. त्यांच्या या प्रेमकथेमध्ये खूप वेगवेगळे पात्र देखील आहेत.

आज त्याबद्दलचा आपण उलगडा करू या. अर्जुन कपूर, बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीपासून सलमान खानला भेटत असे. त्याच्याकडून वेगवेगळे धडे घेत होता. त्याच काळात, सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता आणि तो एकमेकांसोबत नात्यामध्ये होते. आपल्या बहिणीच्या प्रेमोपोटी, सलमान खानने अर्जुन कपूरला कोणत्याही वेळेला आपल्या घरी येण्याची संमती दिली होती.

त्याच्या खाजगी जीममध्ये येण्याची अनुमती खूप लोकांना आहे, मात्र त्याने ती अनुमती अर्जुन कपूरला दिली होती. आणि इथेच सलमान खान चुकला. कधी जिमसाठी, कधी ट्रेनिंगसाठी, तर कधी अर्पिताला भेटण्यासाठी अर्जुन त्यांच्या घरी आणि घरच्या खास कार्यक्रमामध्ये अगदी बिनधास्त येत-जात असे. त्याच दरम्यान, मलायका आणि अर्जुनमध्ये जवळीक निर्माण झाली.

प्रसंगी बघता, याबद्दल कोणालाही थोडीसुद्धा शंका आली नाही. मात्र अर्पितापासून हे सगळं फार दिवस लपून नाही राहील, आणि सत्य समोर आले. त्यामुळेच तर, इष्कजादे सिनेमा नंतर, कपूर आणि खान कुटुंबामध्ये दुरावा आला होता. अर्पिता आणि अर्जुनाचे नटे उघडपणे संपले साले तरीही, मलायका आणि अर्जुनाचे नाते गुपचूप सुरूच होते. त्यांच्या अ’फे’अरच्या चर्चा रंगत असतानाच, एका फॅशनशोमध्ये अर्जुन आणि मलायका दोघांनी सोबत रॅम्पवॉल्क करत त्या चर्चाची पुष्टी केली.

अर्जुनला भेटली तेव्हा, मलायका अरबाज खानची बायको आणि त्याच्या मुलाची आई होती, सलमान खान आणि अर्पिताची वाहिनी होती. त्यामुळेच त्यांच्या नात्यावर वारंवार टी’का केली जाते. मात्र, प्रेमापुढे काहीही असं म्हणत, मलायका आणि अर्जुन दोघांनी काही दिवसांपूर्वी आपल्या नात्याबद्दल उघडपणे शाश्वती दिली आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.