आईच्या गावात ! बूट पॉलिश करणारा ‘इंडियन आयडल ११’चा विजेता सनी हिंदुस्तानची गर्लफ्रेंड पाहाल तर पाहतच राहाल..

इंडियन आयडल हा शो, माघील जवळपास एक दशकाहून अधिक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. आपल्या देशातील सर्वात पहिला टॅलेंट रियलिटी शो म्हणून इंडियन आयडलला ओळखला जात. या शोमध्ये, उत्तम अश्या गायकांना, आपली गायकी दाखवण्याची संधी मिळते. त्यातूनच ज्यांचे सूर पक्के आहेत आणि आवाज मधुर आहे अश्याना पुढे जाण्याची संधी मिळते.
काही दिवसांपासून हा शो वादाच्या भोवऱ्यात सापडला असला तरीही, या शोमुळे अनेक गायकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे हे मात्र नक्की. अनेक नवीन गायकांना या शोमधून आपले टॅलेंट जगासमोर मांडण्याची संधी मिळते, काही या संधीचं सोनं करुन आपले संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. असे अनेक उदाहरण आपण पहिले आहेत.
या शोच्या ११व्या सीझनचा विजेता सनी हिंदुस्तानी हादेखील त्याला अपवाद नाहीये. कोणे एकेकाळी रस्त्यावर लोकांचे बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्तानी याने आपल्या मेहनत आणि कष्टाच्या जोरावर फळ मिळवलेच. इंडियन आयडल ११ ची ट्रॉफी सनीने जिंकली आणि एक मोठा इतिहास रचला. आणि आज ‘इंडियन आयडल ११’चा विजेता सनी हिंदुस्तानी हे नाव, जगभरात ओळखलं जातं.
या विजयाने त्याचे नशीबच पालटले. यश आणि कीर्ती सोबत, आता तर या सनीला प्रेम देखील मिळालं आहे. एका विदेश अगदी सुंदर अश्या तरुणीच्या पेमात तो पडला असून तिचं नाव ‘रैमडी’ आहे. या शनिवारी सनीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यामध्ये रैमडीसोबत आपले लव-रिलेशन त्याने मोठ्या दिमाखात जाहीर केले होते.
आणि का नाही, त्याची गर्ल-फ्रेंडही आहेच तेवढी सुंदर. त्याने शेअर केलेला गर्ल-फ्रेन्डला कि’स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लंडन येथे एका लाईव्ह म्युझिक शोमध्ये सनीने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. त्यावेळी रैमडीही तिथे हजर होती. हा शो सुरू असतानाच सनीने रैमडीला चक्क स्टेजवर बोलावले, हजारो लोकांच्या गर्दीसमोर आपली तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली.
त्याने मोठ्या प्रेमाने रैमेडीला मिठीत घेतले, तिच्या गालाचे चुं’बन घेतले आणि आपल्या भावनांना वाट मोकळी केली. या शोनंतर तो तिला, पिज्जा व कॉफी डेटवर घेऊन गेला. त्याची गर्ल-फ्रेन्ड रैमडे ही एक लेखिका आणि चित्रकार आहे. एखाद्या बॉलीवूडच्या अभिनेत्रीला देखील माघे टाकेल, इतकी जास्त ती सुंदर आहे.
सुरुवातीला सनी बूटपॉलिश करून मिळणाया पैशातून आपली उपजीविका चालवत होता मात्र, इंडियन आयडल ११ने त्याच्या नशीबाला सुंदर अशी कलाटणी दिली. पंजाबच्या भटिंडा येथील अमरपुरा भागात राहणाया सनीच्या आवाजाने जगभरात सर्वांना वेड लावले आहे. आणि अल्पावधीतच तो सो’शल मी’डियावरसुद्धा चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
त्याचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती आणि सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत होता. गरीब कुटुंबातील सनीने सर्वांना मागे टाकत, परिस्थितीवर मात केली आणि इंडियन आयडॉलचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे संगीताचे कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता फक्त गाणं ऐकून तो शिकला.
सनीची तुलना नुसरत फतेह अली खां यांच्याशीसुद्धा केली गेली आहे. इंडियन आयडल ११ च्या सर्व जजेसला आणि प्रेक्षकांना त्याने आपल्या आवाजाने प्रभावित केले. इंडियन आयडलचे विजेतेपद मिळाल्यावर, सनी हिंदुस्तानीला रोख २५ लाख आणि इंडियन आयडलच्या ट्रॉफीने गौरविण्यात आले. त्यावेळीच त्याला भुषण कुमार यांच्या टी-सीरीजच्या एका आगामी सिनेमात गाण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. टाटा कंपनीची एल्ट्रॉज कारदेखील सनीला मिळाली होती.