असे आहे सैराट फेम’आकाश ठोसर’चे करमाळामधील घर, पहा फोटो….

असे आहे सैराट फेम’आकाश ठोसर’चे करमाळामधील घर, पहा फोटो….

सैराट सिनेमाचे नाव जरी ऐकले तरीही, आर्ची आणि परशा डोळ्यासमोर येतात. किशोरवयातील या प्रेमकथेने केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशातील जनतेला वेडं लावलं होत. या चित्रपटात आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा रोमॅन्स सिनेमा यशस्वी होण्याचं प्रमुख कारण ठरलं, असं म्हणलं तरी चुकीच ठरणार नाही.

या चित्रपटातून रिंकू आणि आकाश दोघांना एक खास ओळख मिळाली. आपल्या पहिल्याच सिनेमात त्या दोघांनी दमदार अभिनय करत मोठा चाहतावर्ग निर्माण केला. आणि दिवसेंदिवस त्याच्या फॅन्सच्या संख्येत भरच पडत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झुंडने तर त्यांना बॉलीवूडमध्ये देखील एका मानाचं स्थान मिळवून दिल आहे.

या चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे खास कौतुक करण्यात आले. खास करुन अभिनेता आकाश ठोसरच विशेष कौतुक करण्यात आलं. सैराट पासून आकाशच्या करियरच्या सुरुवात झाली. या सिनेमाने त्याला प्रचंड यश आणि लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर मात्र आकाश कधी थांबलाच नाही अर्थात तो असे यश त्याला मिळतच राहावे.

परंतु कितीही यश मिळाले तरीही प्रत्येकाला शांत होण्यासाठी एक खास जागा हवी असते. आणि ही जागा सहाजिकच स्वतःच घरच असते. अगदी सर्वसामान्यांप्रमाणेच आकाश देखील आपल्या घरात आला कि शांत होतो. आपल्या घरात आलं की त्याला समाधान मिळते. यश, कीर्ती आणि पैसे कमवत आकाशाला गवसणी घालणाऱ्या आकाशचे पाय मात्र आजही जमिनीवरच आहेत.

अनेक चित्रपटात काम करून बक्कळ पैसे कमावणारा आकाश मात्र आपल्या छोट्याशा घरातच राहतो. काहीच दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आकाशने पुण्याला स्वतःच घर खरेदी केलं आहे. मात्र त्याबद्दल पुढे कोणतीच बातमी अली नाही. आकाश आपल्या वयक्तिक आयुष्याबद्दल फारसा काही कधी बोलत नाही.

त्यामुळे सहाजिकच, त्याने आपल्या घराबद्दल कधीच उघडपणे कोणाला काही सांगितलं नाही. मात्र असं असलं तरीही, सोशल मीडियावर त्याच्या घराची झलक पाहायला मिळते. आकाशने आपल्या घरात अनेक झाड लावले आहेत. कुंड्यांमध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावले आहेत.

आकाशला आपल्या फावल्या वेळात त्या झाडांची काळजी घेणं खूप आवडते. तो पुण्यातील एका फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्याकडे फोर्डची एक कार देखील आहे. शिवाय आकाशकडे एक रॉयल एन्फिल्ड म्हणजेच बुलेट देखील आहे. पुण्यात अनेकवेळा आकाश, आपल्या बुलेटवर फिरताना दिसला आहे.

दरम्यान, आकाश सध्या नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मार्च मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12