प्रसिद्ध अभिनेत्याने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला म्हटले ‘फालतू’, म्हणाला; ‘ट्रेलर पाहून जीव गेला, आता चित्रपट पाहून…

प्रसिद्ध अभिनेत्याने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला म्हटले ‘फालतू’, म्हणाला; ‘ट्रेलर पाहून जीव गेला, आता चित्रपट पाहून…

‘बेशरम रंग’ या गाण्यामधून सगळीकडे धुमाकूळ घातल्यानंतर अखेर शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला लाखो व्युज आले आहेत. यापूर्वी चित्रपटाचे टिझर आणि दीपिका पदुकोणचे बेशरम रंग हे गाणं प्रदर्शित झालं होत. सिनेमाच्या टीझरला तर उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मात्र दीपिकाच्या बेशरम रंग या गाण्यामुळे चांगलाच वाद रंगला.

हा वाद शांत होतो न होतो तोच आता सिनेमाचे ट्रेलर येऊन धडकले आहे. युट्युबवर पठाणचे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तब्ब्ल चार वर्षानंतर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आता चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या बाबतीत चाहत्यांमध्ये देखील उत्साह बघितला जात आहे. सिनेमाच्या ट्रेलरवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र अनेकांना या चित्रपटाचे ट्रेलर अगदी जबरदस्त वाटत आहे.

सिनेमामध्ये जॉन अब्राहम देखील महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. त्याचा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा आहे. नेहमीप्रमाणेच जॉन, पठाण चित्रपटामध्ये देखील अतिशय हँडसम दिसत आहे. सिनेमाच्या ट्रेलर मध्ये डिम्पल कपाडिया यांचा देखील हटके लूक समोर आला आहे. हा चित्रपट अगदी ऍक्शन पॅक सिनेमा असेल हे तर समोर आलेच आहे.

सोबतीला दीपिका पदुकोण आणि जॉनचा दमदार अभिनय, यामुळे आता पठाणला थिएटर मध्ये जाऊन पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असलं तरीही अनेकांनी या चित्रपटाला बॉयकॉट करा म्हणून देखील सोशल मीडियावर चर्चा सुरु केली आहे. काहींनी या ट्रेलरवर टीका देखील केली आहे. यामध्ये एका खास व्यक्तीने चित्रपटाच्या ट्रेलरवर टीका केली आहे. सोबतच, हा चित्रपट अतिशय खराब आणि फालतू असेल असं म्हणलं आहे.

अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खानने या चित्रपटाला ‘डिझास्टर’ म्हणून संबोधले आहे. या चित्रपटावर टीका करत त्याने, शाहरुख खान सोबत जॉन आणि दीपिकाची देखील खिल्ली उडवली आहे. याबद्दल एक ट्विट करत त्याने लिहलं आहे की, ‘पठाणचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा धक्का बसला आहे. हे नेमकं काय आहे? इतका एकच प्रश्न माझ्या डोक्यात फिरत आहे.

शाहरुख खान असा फालतू चित्रपट कसा करू शकतो? जॉन अब्राहमच्या अटॅक या चित्रपटाची कथासुद्धा अशीच होती आणि तोसुद्धा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.’ चित्रपट दिग्दर्शक आनंद कुमार यांनी पठाणच्या ट्रेलरबद्दल एक ट्विट केलं आहे. ‘खरोखर खूपच उत्तम,’ असं चित्रपटाचं कौतुक करणारं एक ट्विट त्यांनी केलं. त्यावरही प्रतिक्रिया देत केआरकेनं टीका केली.

‘भाई, काहीही बोलू नको. देवसुद्धा या चित्रपटाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाही’, असं केआरकेने लिहिलं. कमाल आर. खान इतक्यावरच थांबला नाही तर, थेट शाहरुखच्या ट्विटवर देखील त्याने प्रतिक्रिया दिली. ‘भाईजान, शुभेच्छा! हा 100 टक्के फ्लॉप ठरणार आहे. आणखी एक चुकीची निवड. पुढच्या चित्रपटासाठी शुभेच्छा’, असं त्याने शाहरुखच्या ट्विटवर म्हटलंय. इतक्या जास्त वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर ‘पठाण’ चित्रपटाचं भवितव्य नेमकं काय असेल, हे मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12