अरे हे काय? प्रे’ग्नेंसी मध्ये वाढलं आलियाच इतकं वजन! प्रथमच बेबी-बम्प सोबतचे फोटो आले समोर! ओळखनही झालं अवघड

नव्या दमाची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टने कायम स्वतःला सिद्ध केले आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून तीन बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली आणि त्यानंतर तिने कधीच माघे वळून पाहिलं नाही. एक उत्तम अभिनेत्री म्हणून आलीयाने कायमच स्वतःला सिद्ध केल आहे.

एक कमर्शियलच नाही तर क्रिटिक्स कडून देखील आलियाने अनेकवेळा आपल्या जबरदस्त अभिनयाने कौतुक कमवल आहे. आलियाला अनेकवेळा टीकेचा सामना देखील करावा लागला आहे. मात्र असं असलं तरीही तिने आपल्यावर होणाऱ्या टी’का देखील सकारत्मक दृष्टीने घेतल्या आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या आलिया ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून गणल्या जाते. आलिया हिचा गंगुबाई काठीयावाडी हा चित्रपट प्रचंड चालला. यासाठी ती रेड लाईट एरिया मध्ये गेली होती. राजामौलीच्या आरआरआर या चित्रपटात देखील ती झळकली आहे.

नुकतंच ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. यामध्ये देखील तिच्या लूकची चांगलीच चर्चा सांगली आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटाच्या दरम्यान आलिया आणि रणबीरला एकमेकांच्या प्रेमाची जाणीव झाली. त्यामुळे या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री बघण्यासाठी चाहते चांगलेच आतुर आहेत.

परिणामी आज आलियाचा केवळ बॉलीवूडमधेच नाही तर साऊथ इंडस्ट्री आणि हॉलीवूडमध्ये देखील मोठा चाहतावर्ग आहे. आलिया नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील उघडपणे बोलत असते. एप्रिल महिन्यात नुकतंच आलिया आणि रणबीर लग्नबेडीत अडकले. त्यापूर्वी त्याच्या नात्याच्या देखील चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या.

लग्नानंतर हे दोघे हनिमून ला कधी जाणार याबाबतच्या बातम्या देखील सोशल मीडियावर चर्चिल्या जात होत्या. मात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे ते हनिमूनला जाऊ शकले नाही, असेही सांगण्यात आले. त्यातच आता आलिया भट ही गरो-दर असल्याचे सांगण्यात आले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आता आपल्या बाळाची वाट पाहत आहेत.

चाहते रणबीर-आलियाची फिरकी घेत त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याच्या या शुभेच्छांमुळे आलिया देखील भावुक झाली. आणि तिने त्याबद्दलची एक पोस्ट देखील शेअर केली आहे. रणबीर कपूर याने देखील प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी घटना आहे.

आलिया हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आवर ‘बेबी कमिंग सून’ असे म्हटले आहे. सोबतच तिने रुग्णालयातल्या आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये टीव्ही स्क्रीनवर हार्ट शेप इमोजी दिसत आहे, आणि ती बेडवर झोपलेली दिसत आहे. कपूर कुटुंबात सध्या आनंदाचे वारे वाहत आहे.

त्याच्या आयुष्यातील या खास टप्प्यामध्ये चाहते देखील चांगलेच आनंदी झाले आहेत. त्यांना शुभेच्छा देत वेगवेगळ्या मिम्सचा देखील वर्षाव होतो आहे. मजेशीर अशा या मिम्स बघून आलिया आणि रणबीर देखील खुश झाले आहेत. मात्र असं असलं तरीही गरो’दरपणात आलियाची एक झलक बघण्यासाठी चाहते आतुर झाले होते.

चाहत्यांची हीच इच्छा पूर्ण झाली आहे. कारण आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरील ग्लो खूप काही सांगत आहे. कोणत्याही मेकअप शिवाय आलिया या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

आलियाचं निखळ सौंदर्य आणि चेहऱ्यावरील तेज यामुळे हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. तीच्या चेहऱ्यावरील सुंदर हास्याने अनेकांचे हृदय जिंकले. ‘गोड बातमी तर दिली, पण तारीख काय असेल?’ असं म्हणत बाळ कधी येणार असा प्रश्न चाहते तिला विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12