अरर..! टीआरपी घसरल्यामुळे ‘झी मराठी’ने नुकतीच चालू झालेल्या ‘या’ मालिकेला दिला निरोप…

झी मराठीवरील मालिकांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे. या वाहिनीवरील मालिकांनी टीआरपीचे नव-नवे विक्रम कायम केले आहेत. राधा ही बावरी, तू तिथ मी, माझ्या नवऱ्याची बायको, लगीर झालं जी, तुला पाहते रे या मालिका चांगल्याच हिट ठरल्या.

‘जय मल्हार’ आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ सारख्या ऐतिहासिक मालिकांनी तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या वाहिनीवर येणाऱ्या अनेक मालिकांनी, कलाकरांना नवी ओळख मिळवून दिली. सा रे ग म प, फु बाई फु, चला हवा येऊ द्या सारखे रियालिटी शो कित्येक वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहेत. त्यामुळे झी मराठी वाहिनीचा टीआरपी कायमच चांगला असतो.

सध्या देखील झी मराठीवर काही मालिकांनी धुमाकूळ घातला आहे. देवमाणूस, येऊ कशी तशी मी नांदायाला, माझी तुझी रेशीमगाठी या मालिका सध्या चांगल्या चालू आहेत. पण अस असल तरी गेल्या काही दिवसांमध्ये झी मराठीची टी आर पी घासरतान दिसत आहे.

मात्र इतर वाहिन्यांची तुलना केली तर स्टार प्रवाह, झी मराठी, सोनी मराठी, कलर्स वाहिनी या मराठी वाहिनींवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांना काही ना काही वेगळं मनोरंजन देत आहे. यामुळेच झी ची टी आर पी कमी झाली आहे. म्हणजे मालिका चालू असल्यातरी त्यांना पहाणार चाहतावर्ग मात्र कमी झाला आहे.

त्यामुळेच झी मराठी एक नवीन मालिका बंद करणार आहे. झी मराठीने 2 महिन्यांपूर्वीच सुरू झालेली मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सत्यवान सावित्री’ हि मालिका झी ने बंद करण्याचा निर्णय झी ने घेतला आहे. या मालिकेले नुकतेच 2 महीने झाले होते पण घासरलेल्या टी आर पी मुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

imdbच्या टॉप 10 रेटिंगमध्ये झी च्या फक्त दोनच मालिका येऊ शकल्या. आता हि मालिका बंद झाल्यानंतर दुसरी मालिका झी घेऊन येणार आहे. सध्या झी मराठीवर ‘मन उडू उडू झालं’, माझी तुझी रेशीमगाठ’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’, ‘देवमाणूस २’, ‘तू तेव्हा तशी’ या मालिका आणि ‘होम मिनिस्टर खेळ सख्यांचा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘बस बाई बस’, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हे रिऍलिटी शो सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12