अमृता फडणवीस यांनी घेतली उर्फी जावेदची बाजू, म्हणल्या; ‘उर्फी एक स्त्री आहे, पण ती जे काही करतेय ते….’

अमृता फडणवीस यांनी घेतली उर्फी जावेदची बाजू, म्हणल्या; ‘उर्फी एक स्त्री आहे, पण ती जे काही करतेय ते….’

उर्फी जावेद सध्या सगळीकडे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. उर्फीने सगळीकडेच आपल्या नावाची चर्चा रंगवली आहे. आज देशभरात उर्फी आणि तिचे कपडे देशभरात वादाचा मुद्दा बनले आहेत. उर्फी घालत असलेल्या कपड्यांवरून राज्यामध्ये चांगलाच राजकारण तापलं आहे.

उर्फीची स्टाईल आणि फॅशन नक्कीच विचित्र आणि तेवढाच अधिक बोल्ड आहे, असं म्हणायला हरकत नाही. उर्फी आपले कपडे स्वतः बनवते. ती घालत असणाऱ्या कपड्यामुळे तरुणाईला चुकीचा संदेश जात आहे, असं मत काही राजकारणींनी मांडलं आहे. त्यादृष्टीने अनेकांनी तिला धमकी दिली आहे.

अनेकांनी तिला ध’मकी दिली असली तरीही काहीनी तिला आपलं समर्थन देखील दिल आहे. आता एका खास व्यक्तीने तिला आपलं समर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती चित्रा वाघ यांच्याच पक्षाशी संबंधित आहे. ती व्यक्ती इतर कोणी नसून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आहेत.

अमृता फडणवीस राजकारणाशी निगडित काही विधान करतच असतात. अमृता फडणवीस मनोरंजनसृष्टीमध्ये बऱ्यापैकी सक्रिय आहेत. आपल्या गायिकीसोबतच त्यानी काही म्युझिक मध्ये अल्बममध्ये देखील काम केले आहे. काही म्युझिक अल्बममध्ये त्यांनी अभिनय केला आहे. नुकतंच आता त्यांचा एक अल्बम रिलीज झाला आहे.

विशेष म्हणजे त्यांनी या अल्बममध्ये अभिनय केला आहे. सध्या सगळीकडे अमृताचा हा अल्बम चर्चेचा विषय ठरत आहे. तर आता उर्फीच्या प्रकरणावर देखील अमृता फडणवीसने आपलं मत व्यक्त केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या कपड्यावर आणि बोल्ड विधानांवर यापूर्वी अनेकवेळा अनेकांनी टी’का केली आहे.

मात्र अमृता फडणवीसने या सर्व बाबींना कधीच दाद दिली नाही. व्यक्ती स्वातंत्र्य या विचाराचा अमृता फडणवीस कायम पुरस्कार करत असतात. कोणी काय कपडे घालावे, काय करावे या पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे, असं मत अमृता व्यक्त करतच असतात. त्यामुळे यावेळी देखील त्यांनी उर्फीची साथ दिली आहे.

उर्फी एक कलाकार आहे त्यामुळे तिला अशा प्रकारचे कपडे घालावे लागणार आहेत, असं मत अमृता फडणवीसने व्यक्त केलं आहे. याबद्दल बोलताना अमृता म्हणाल्या, ‘काहींची व्यावसायिक गरज असते. त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते ठिक नाही.

ऊर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे.’ सार्वजनिक ठिकाणी उर्फीने बोल्ड कपडे घालू नये. मात्र त्याशिवाय इतर ठिकाणी तिन काहीही घातलं तरी कोणी तिला अडवू नये, असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12