अभिषेक नाही तर ‘या’ व्यक्तीलाच वडील समजली होती आराध्या, यावर ऐश्वर्याची होती अशी प्रतिक्रिया…

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन आता 9 वर्षांची झाली आहे. आराध्याचा जन्म 16 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबई येथे झाला होता. तथापि, पापा अभिषेक बच्चन आणि आई ऐश्वर्या राय बच्चन यांनी घोषित केले होते की दरवर्षीप्रमाणे यंदा मुलगी आराध्याचा वाढदिवस भव्य पार्टी साजरी करून होणार नाही.
मिड-डे सोर्सच्या म्हणण्यानुसार, या वेळी सर्व बॉलिवूड मध्ये सेलिब्रेशन अत्यंत कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत आराध्याच्या वाढदिवसाचा उत्सवही छोटा होईल. खरं तर असं घडलं होतं की रणबीरने हुबेहूब अभिषेख सारखे जॅकेट आणि टोपी घातली होती. अभिषेख सारखाच दिसणाऱ्या रणबीर ला बघून आराध्याला वाटले की तेच तिचे पापा आहे. आणि तिने पळत जाऊन रणबीरलाच मिठी मारली होती. ऐश्वर्या राय यांनी स्वत: ही कथा काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितली होती.
तसे, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ऐश्वर्याच्या मुलीने रणबीर कपूरला आपले वडील मानले. ऐश्वर्या राय 2016 मध्ये ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात रणबीर कपूरच्या सोबत काम करत होती. दरम्यान, ऐश्वर्या आणि रणबीर कपूर यांनी एका फॅशन मासिकासाठी फोटोशूट देखील केले होते. या फोटोशूट दरम्यान आराध्यादेखील अॅशसोबत होती.
येथेच आराध्याला रणबीर कपूर बद्दल गैरसमज झाला होता की तो तिचा पिता आहे. मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की एकदा आराध्याला समजले की रणबीर तिचाच पापा आहे. तीने सांगितले होते- एक दिवस आराध्याने धावत येऊन रणबीरला मिठी मारली होती आणि त्याच्या मांडीवर बसली होती. कारण त्याने अभिषेकसारखे जॅकेट आणि कॅप घातली होती.
जेव्हा आराध्याने रणबीरचा चेहरा पाहिला तेव्हा तिलाही धक्काच बसला. ऐश्वर्यानेही रणबीर आणि आराध्याची मैत्री खूप मजेदार असल्याचे सांगितले होते. आराध्या रणबीरला आरके म्हनत होती. दोघांनी एकत्र खूप मजा केली होती. आराध्या ही एक स्टार किड जरी असली तरी अभिषेक -ऐश्वर्या आपल्या मुलीला सामान्य मुलांप्रमाणेच वाढवत आहे.
आराध्या तिच्या वडिलांच्या अगदी जवळ आहे आणि बर्याचदा त्या दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग करतानाही दिसते. आराध्या धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत आहे. लॉ-कडाऊनमुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत. ऐश्वर्या राय आपल्या मुलीची खूप दक्षता घेत आहे. ती तिला कुठेही एकटे जाऊ देत नाही अगर सोडत नाही.