अभिमानस्पद ! ‘ही’ भारतीय अभिनेत्री थेट अमेरिकन आर्मीत झाली दाखल, पहा अशा प्रकारे मिळाले यश…

सिनेमा एक असं क्षेत्र आहे, जिथे यश मिळ्वण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अनेकवेळा संघर्ष करून देखील यश मिळेल याची खात्री नसते. आज देखील सिनेमामध्ये काम मिळवण्यासाठी आपली वेगळी अशी खास ओळख निर्माण करण्यासाठी कित्येकजण प्रयत्न करत आहेत.
आपल्या प्रयत्नांना यश मिळाले की, या क्षेत्रात कधीच कोणताही सेलेब्रिटी माघे वळून बघत नाही. या क्षेत्रामध्ये तेवढी जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता असते. त्यामुळे ती सोडून जाण्यामध्ये कोणालाच रस नसतो. आणि असं घडत देखील नाही. प्रसिद्धी कोणाला नको असते? एकदा लोकप्रियता मिळाली की, अजून जास्त लोकप्रियता कशी मिळवता येईल याकडेच सगळ्यांचे लक्ष असत.
आजवर तुम्ही ऐकलं आहे का, मनोरंजन सृष्टीमध्ये मिळालेलं यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियता सोडून कोणी दुसऱ्या क्षेत्राची निवड केली? तर नाही, आणि असं म्हणलं तरीही अनेकजण यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र असच अगदी अविश्वसनीय काम तामिळ इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्रीने केलं आहे. या अभिनेत्रीने, सिनेमा क्षेत्राला कायमचा राम-राम ठोकत थेट आर्मीमध्ये प्रवेश केला आहे.
मूळ भारतीय वंशाची आणि सध्या अमेरिकेची नागरिक असणारी अकिला नारायणने ही कमाल केली आहे. अकिला नारायणने माघील वर्षी प्रदर्शित झालेल्या कदमपुरी या सिनेमातून साऊथ सिनेसृष्टीमधे पदार्पण केले होते. कदमपुरी हा एका हॉरर-सस्पेन्स सिनेमा होता. या सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता आणि अकिलाला त्यानंतर अनेक सिनेमाच्या ऑफर्स देखील येत होत्या.
या सिनेमातून तिची लोकप्रियता देखील चांगलीच वाढली होती. मात्र असं असलं तरीही आता ती पुन्हा सिनेमात झळकणार नाही. आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण करून, अमेरिकेच्या आर्मीमध्ये आता अकिला आर्मी-वकील म्हणून रुजू झाली आहे. अकिला केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम गायिका देखील आहे.
‘नाइटिंगेल स्कूल ऑफ म्युझिक’ नावाची ऑनलाइन संगीत शाळा देखील चालवत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकन सैन्यात दाखल होण्यासाठी अकिला हिने अनेक महिने अमेरिकन सैन्याचे लढाऊ प्रशिक्षण घेतले होते. ये शिक्षण यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, आता अभिनेत्री अकिला वकील म्हणून अमेरिकन सैन्यात दाखल झाली आहे.
ती अमेरिकन लष्करी कर्मचार्यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणार आहे. सध्या आपण राहत असणाऱ्या देशाची सेवा करण्याकरिता ती सैन्यात दाखल झाली आहे. तिच्या या निर्णयाचे सगळीकडूनच कौतुक करण्यात येत आहे. देशभक्तीसाठी मिळणारी प्रसिद्धी सोडून देऊन स्वतःला देश सेवेसाठी झोकून देणे खरोखर कौतुकास्पद आहे.
तिच्या कुटुंबाने देखील तिच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तिच्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती आता स्वतःला आर्मी फॅमिली म्हणवून घेत आहेत. आपण राहत असणाऱ्या देशाची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे अशी भावना तिच्या कटुंबाने व्यक्त केली आहे. ‘देशभक्ती सर्वोपरी आहे. आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर ती कधीच कोणीही सोडू नये असं मला वाटतं.
सिनेमामध्ये मिळणार यश देखील माझ्यासाठी म्हत्वाच होत. पण आता थेट मी राहत असलेल्या देशाची सेवा करणायच सौभाग्य मला मिळत आहे. म्हणून मला ते करण्यात खूप आनंद आहे,’ अशी भावना अकिलाने व्यक्त केली आहे. तिने घेतलेल्या निर्णयाचे सगळीकडून स्वागत करण्यात येत आहे.