अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, झी मराठीवरील ‘या’ सिरीयल मध्ये केलंय काम..

अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, झी मराठीवरील ‘या’ सिरीयल मध्ये केलंय काम..

मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेते आहेत. पण काही अभिनेत्यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेतली. अभिनेत्यांनी कोणतीही भुमिका निभावली तरी प्रेक्षकांना आवडते. असेच एक अभिनेते म्हणजे निळू फुले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने त्यांच्या भुमिकांना अजरामर बनवले आहे.

निळू फुले यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक नकारात्मक भुमिका निभावल्या आहेत. त्यामुळे त्यांना मराठीतील सर्वात प्रसिद्ध खलनायक म्हणून ओळखले जाते. खलनायक म्हणून निळू फुले यांना सर्वचजण ओळखतात. त्यासोबतच एक उत्तम माणूस म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.

खुप कमी लोकांना माहीती असेल की निळू फुले यांची मुलगी देखील अभिनय क्षेत्रात आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. चला तर जाणून घेऊया निळू फुले यांच्या मुलीबद्दल. निळू फुले यांच्या मुलीचे नाव गार्गी फुले थत्ते आहे. त्यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे.

त्यामुळे अभिनय शिकण्यासाठी त्यांना जास्त काही शिकावे लागले नाही. लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत. त्यांनी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर गार्गी यांनी झी युवावरील कट्टी बट्टी या मालिकेतून टेलिव्हिजनवर प्रवेश केला.

त्यावेळी त्यांना काम तर मिळाले होते. पण त्यांना अभिनेत्री म्हणून खरी ओळख झी मराठीवरील ‘तुला पाहते रे या’ मालिकेतून मिळाली. सुरुवातीला जेव्हा गार्गीला तुला पाहते रे मालिकेसाठी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या मालिकेला नकार दिला होता. कारण त्यांची कट्टी बट्टी मालिका सुरू होती. त्यामुळे त्यांनी निर्मात्यांना नकार दिला होता.

पण निर्मात्यांनी परत एकदा विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, माझी कट्टी बट्टी मालिका सध्या सुरू आहे. ही मालिका संपल्यानंतरच मी दुसरी मालिका सुरू करणार आहे. त्यानंतर निर्मात्यांनी काही दिवस वाट बघितली. कट्टी बट्टी मालिका संपल्यानंतर तुला पाहते रे मालिका सुरु करण्यात आली होती.

या मालिकेत त्यांनी इशाच्या आईची भुमिका निभावली होती. ही मालिका टीव्हीवर खुप कमी वेळात प्रसिद्ध झाली. या मालिकेने गार्गीला खरी ओळख मिळवून दिली. त्यांना सगळीकडे इशाची आई म्हणून ओळख मिळाली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

यासोबतच त्यांना कुकिंग आणि गाण्यात देखील आवड आहे. पण सध्या त्या अभिनय क्षेत्रातील करिअरकडे लक्ष देत आहेत. वडील निळू फुले यांनी अभिनयाची दिलेली एक शिकवण कायम लक्षात ठेवत असल्याचं गार्गी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. बाबांची एक गोष्ट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. ते मला सांगायचे, जेव्हा तू कॅमेरासमोर जाशील तेव्हा तू स्वत: अमिताभ बच्चन आहेस असंच समज.

तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असला तरी तुझं अभिनय दमदारच असला पाहिजे, असे त्यांनी म्हणाले होते. हीच गोष्ट आयुष्यात नेहमीच कॅमेरासमोर असताना डोक्यात राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12