‘कमिटमेंट’ चा पक्का पक्का असणारा सलमान खान यावेळी मात्र चुकला; हात जोडून मागितली माफी…

‘कमिटमेंट’ चा पक्का पक्का असणारा सलमान खान यावेळी मात्र चुकला; हात जोडून मागितली माफी…

अभिनेता सलमान खान म्हटले की, एक दबंग असा अभिनेता आपल्यासमोर उभा राहतो. सलमान खान याचे चित्रपट म्हणजे ते हमखास चालणारच. हा पायंडा गेल्या तीस वर्षापासून असाच सुरू आहे. सलमान खान याने खऱ्या अर्थाने राजश्री प्रोडक्शन यांच्या मैने प्यार किया या चित्रपटातून पदार्पण केले होते.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्याने बागी, कुरबान, वीर, दबंग, दबंग 2, तेरे नाम यासारखे चित्रपट केले. मात्र, त्याला राजश्री प्रॉडक्शन्स चित्रपटाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, असे म्हणावे लागेल. मैने प्यार किया नंतर सलमान खान याने राजश्री प्रोडक्शनच्या हम साथ साथ है या चित्रपटात काम केले होते.

हा चित्रपट त्यावेळी प्रचंड चालला होता. यामध्ये त्याची आणि सोनाली बेंद्रेची जोडी खूप गाजली होती. या दोघांची केमिस्ट्री अनेकांना देखील आवडली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खान, तब्बू, करिष्मा कपूर, शक्ती कपूर, आलोकनाथ,रीमा लागू, नीलम यासारख्या अभिनेता व अभिनेत्री यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड चालला होता.

गेल्या काही वर्षात चित्रपटाचे गणित देखील आता बदलले आहे. आता अभिनेते चित्रपटाची निर्मिती करताना खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. पूर्वीच्या काळी असे होत नव्हते. पूर्वीच्या काळी अभिनेता केवळ अभिनयच करायचा. मात्र, काही अपवाद यामध्ये होते. यात राज कपूर यांचा अपवाद होता. मनोज कुमार यांचाही अपवाद होता.

हे दोन्ही अभिनेते आपल्या चित्रपटाची निर्मिती स्वतःच करायचे आणि अभिनय देखील करायचे. सध्याच्या जमान्यात सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अजय देवगन, अक्षय कुमार यासारख्या अभिनेत्यांचे स्वतःचे प्रॉडक्‍शन हाउस आहे. प्रोडक्शन हाऊस या माध्यमातून ते स्वतःचे चित्रपट तयार करत असतात.

मात्र, इतर चित्रपट देखील या माध्यमातून तयार करत असतात. काही दिवसांपूर्वीच अजय देवगन याचा बॅनरखाली बेलबॉटम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन हा दिसला होता. तसेच अजय देवगनचा तानाजी हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाची निर्मिती केली होती.

दरवर्षी ईद ला सलमान खान याचा एक तरी चित्रपट प्रदर्शित होणार असतो. मात्र, गेल्या दोन वर्षापासून हा पायंडा को’रोना म’हामा’री मुळे मोडीत निघाला आहे. नाहीतर ईदच्या पार्श्वभूमीवर सलमान खान चे चित्रपट असतात. या आधी त्याचा टायगर जिंदा है, हा चित्रपट देखील असाच आला होता. हा चित्रपट प्र’चंड चालला होता.

मात्र, आता त्याचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा ‘राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट काही चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खान याने नुकताच मीडियाशी संवाद साधला. यामध्ये बोलताना सलमान खान म्हणाला की, हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता होती.

आणि तशी कमिटमेंट देखील चित्रपटगृहाच्या मालकांना केली. मात्र, आता असे होताना दिसत नाही. त्यामुळे मी चित्रपटगृहाच्या मालकाची मा’फी मागतो. यामुळे त्यांना खूप मोठे नु’कसान होणार असल्याचे देखील तो म्हणाला. नाही तर सलमान खान यांचा चित्रपट चित्रपट 500 कोटींचा व्यवसाय निश्चितच करत असतो. यामुळे चित्रपट गृह मालकांना खूप फायदा होतो.

तसेच चित्रपटावर अवलंबून असलेल्या घटकांना देखील यामुळे पगार पाणी मिळत असते. राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने अनेक चाहत्यांनी थेटर्स बुक केले होते. मात्र, सलमान खान म्हणाला की, आम्ही लोकांच्या जिवाची अधिक परवा करणार आहोत.

चित्रपटगुहामधून लोकांनी कोरोणा घरी घेऊन जाऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे हा चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरच प्रदर्शित होईल, असेही तो म्हणाला. ज्यांना प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहणे शक्य आहे, त्यांनी हा चित्रपट पाहावा, असेही तो म्हणाला. एकूणच सलमान खान याने कुणाला दिलेली कमिटमेंट पहिल्यांदाच यामुळे मोडली, असे म्हणावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12