अभिनेता दीपक तिजोरी आठवतो का? त्याची मुलगीही आहे प्रसिद्ध अभिनेत्री, तिच्या हॉटनेसपुढे जान्हवी आणि आलियाही पडेल फिकी…

असं म्हणतात प्रत्येक शुक्रवारी बॉलीवूडकरांचं नशीब बदलत. शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, त्यामधील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते सर्वांचेच नशीब त्या एका चित्रपटावर आधारित असत. अलीकडच्या काळात ओटीटीची क्रेझ बऱ्यापैकी वाढली आहे.
मात्र असं असलं तरीही, आता थिएटर पुन्हा सुरु झाले आहेत परिणामी बॉक्स ऑफिसचा गेम देखील पुन्हा सुरु झाला आहे. बॉक्स ऑफिसवर ज्या चित्रपटाची जादू चलते त्याच चित्रपटातील कलाकारांनी एक खास ओळख मिळते. कधी-कधी फक्त एक चित्रपट त्यामधील सर्वच कलाकारांचे नशीबच पालटून टाकतो.
९०च्या दशकातील आशिकी हा चित्रपट देखील त्याच चित्रपटांपैकी एक आहे. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या ‘अभिमान’ सिनेमाच्या कथानकावर आधारित महेश भट्ट यांनी ‘आशिकी’ सिनेमा बनवला. या सिनेमातील गाणी, कलाकारांचा अभिनय यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला.
या चित्रपटामुळे महेश भट्ट याना देखील एक नवी ओळख मिळाली. तसेच चित्रपटातील कलाकार अनु अग्रवाल, राहुल रॉय, दीपक तिजोरी, अवतार गिल यांची लोकप्रियता तर शिगेला पोहोचली होती. दीपक तिजोरी यांनी या चित्रपटामध्ये सह कलाकाराची भूमिका साकारली होती. बॉलीवूडमध्ये त्याचा हा पहिलाच चित्रपट होता.
पण त्याचा अभिनय बघता, तो नक्कीच लंबी रेस का घो’ डा ठरेल असे भाकीत अनेकांनी केले होते आणि ते सत्य ठरले. आपल्याच पहिल्याच चित्रपटात दीपक तिजोरी यांनी स्वतःच्या अभिनयाने चांगलेच कौतुक मिळवले आणि त्यानंतर त्याने एका पाठोपाठ एक यशाची शिखरच गाठली. खिलाडी या सिनेमात त्याने महत्वपूर्ण पात्र रेखाटले होते.
जो जिता वही सिकंदर, कभी हां कभी ना, अंजाम, गुलाम, आणि बादशाह सारख्या सुपरहिट सिनेमामध्ये देखील त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. १९९३मध्ये ‘पेहला नशा’ या सिनेमातून त्याने रविना टंडन आणि पूजा भट्ट यांच्यासोबत मुख्य कलाकार म्हणून देखील काम केले होते.
आपल्या भल्या-मोठ्या करियरमध्ये त्याने निगेटिव्ह, तर कधी सह कलाकार म्हणून असे सर्वच प्रकारचे पात्र रेखाटले. एक उत्तम अभिनेता म्हणून बॉलीवूडमध्ये त्याच नाव घेतलं जात. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याच्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्याची मुलगी ‘समारा’ हिने नुकतेच बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.
जॉन अब्राहमच्या ढिशुम या चित्रपटासाठी तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होत. त्यानंतर ग्रँड प्लॅन या शॉर्ट- सिनेमामध्ये देखील ती झळकली होती. आपल्या पहिल्याच सिनेमात तिने लि’प-लॉक सिन दिला. त्यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर समाराने अभिषेक बच्चन सोबत ‘बॉब बिस्वास’ सिनेमात महत्वपूर्ण भूमिका रेखाटली होती.
सावळ्या रंगाची समारा खूप जास्त हॉट आहे. सोशल मीडियावर ती खूप जास्त सक्रिय असते. आपले वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतच असते. तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतो. समाराला फूटबॉल खेळायला खूप आवडत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा आगामी सिनेमा ब्रम्हास्त्र मध्ये देखील समाराने छोटेसे पात्र रेखाटले आहे.