अनुष्का शर्माला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत काम करायला वाटते भीती; म्हणाली तो अविवाहित असल्यामुळे मला जास्त….

बॉलीवूड मध्ये आपण अनेक अभिनेत्यांच्या वेगवेगळ्या सवयींनबद्दल ऐकले आहे. त्याच्या या सवयी शूटिंगच्या दरम्यान मात्र मेकर्स साठी डोकेदुखी बनतात. थोडं असेल तर त्याबद्दल अजून मोठं करून सांगितलं जातं. अभिनेत्यांच्या बाबतीत तर हमखास असे होतंच, हे आपण पहिले आहे.
मग अश्या वेळी काही नवीन अभिनेत्री मात्र त्याची धास्ती घेतात आणि त्या अभिनेत्यापासून दूरचं राहतात. नाना पाटेकर यांचं नाव त्यामध्ये सर्वात पुढे आहे. प्रहार सिनेमा रिलीज झाला आणि खूप हिट देखील झाला. मात्र याचे प्रमुख आकर्षण ठरल्या या सिनेमाच्या अभिनेत्री; डिम्पल कपाडिया आणि माधुरी दीक्षित या दोन्ही सुंदर आणि दिग्ग्ज अभिनेत्रींना मेकअप शिवाय सर्वानी पाहिले.
नाना पाटेकर यांनी अश्या गंभीर सिनेमामध्ये, कधीच अभिनेत्रीला मेकअप करू दिला नाही. क्रांतिवीर आणि प्रहार त्यापैकी च आहेत. एकाच टेक मध्ये सीन झालाच पाहिजे, त्यासाठी हवं तर आधी हवे तितक्या वेळा प्रॅक्टिस करा असे काही कठोर नियम नाना पाटेकर सोबत काम करताना अभिनेत्रींना आणि सोबतच्या सहकलाकारांना पाळावे लागत.
त्यानंतर एक वेळ अशी आली कि नाना पाटेकर यांच्या सोबत काम करण्यासाठी बॉलीवूड ची कोणतीच अभिनेत्री तैयार होत नव्हती. तिला त्यांची भीती वाटत होती. त्यांच्यासोबत खामोशी, अग्नी पुरुष सारखे हिट सिनेमा मधून काम करणारी मनीषा कोईराला एकदा बोलली होती,’मला सतत एक टेंशन असायचं कि टेक चांगला नाही झाला तर नाना नक्कीच ओरडणार.
मी त्यांच्या भीतीने टेक परफेक्ट देण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यातूनच मी माझा अभिनय सुधरवू शकले.’ नाना यांच्या अश्या कडक आणि कठोर वागण्यामुळेच त्यांचे अनेक सहकलाकार उत्तम अभिनय शिकले असे म्हणतात मात्र तरीही त्यांच्या सोबत काम करणे अवघड असल्याचे अजूनही बॉलीवूड मध्ये बोलले जाते. असेच काही अजून एका अभिनेत्या बद्दल बोलले जाते.
ते म्हणजे ‘सलमान खान’. त्याच्याबद्दल देखील बॉलीवूड मध्ये खूप काही गॉसिप ऐकण्यात येतात. तो खूप मुडी आहे, असे नेहमीच सगळ्यांना ऐकायला मिळते. आपल्याच मर्जीने तो अभिनेत्रींना कपडे घालायला लावतो, त्यांच्या रोलमध्ये देखील त्याचे लक्ष असते. असे अनेक गॉसिप त्याच्याबद्दल ऐकले आहे. आणि हेच सर्व साहजिकच अनुष्का शर्मा हिने सुद्धा ऐकले होते.
हे सगळं ऐकल्यामुळे, ती सलमान खान सोबत काम करायला घाबरत होती. याबद्दलचा खुलासा तिने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये केला होता. सुलतान सिनेमाच्या प्रमोशन साठी सलमान खान आणि अनुष्का शर्मा कपिलच्या शो मध्ये आले होते, तेव्हा त्या सिनेमाचे ट्रेलर दाखवण्यात आले होते. त्यामध्ये सलमान खान बाईक वर अनुष्काच्या माघे बसलेला दिसत होता.
तेव्हा आपल्या खास विनोदी शैली मध्ये कपिलने अनुष्काला विचारले तू, रब ने बना दि जोडी मध्ये शाहरुख खानला आपल्या माघे बसवलं, मग पिके मध्ये अमीर खानला आणि आता सलमान खान; म्हणजेच बॉलीवूडच्या तिन्ही खानला तु गाडीवर तुझ्या माघे बसवलं. तर यामध्ये सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटत होती. यावर अनुष्काने उत्तर दिले, तिला सलमान खान ची सगळ्यात जास्त भीती वाटत होती.
सलमान सोबत काम करायला तिला भीती वाटत होती. कपिलने तिला याचे कारण विचारले असता, तिने संगितले कि सलमान खान बदल बऱ्याच गोष्टी तिने ऐकल्या होत्या म्हणून तिला ते सगळं खरंच आहे सारे वाटून त्याच्या सोबत काम करण्याची भीती वाटत होती असे तिने सांगितले. त्यानंतर मात्र सलमान तिची चांगलीच मज्जा घेतली, एक बाईकचा सीन शूट करण्यासाठी किती टेक घेतले मॅडम ? पण मजाल आहे माझी, मी काहीच नाही बोललो. ते पण सांगा मॅडम. सलमान या उत्तरावर एकाच हशा पिटली.