अजय देवगण नाही तर ‘हा’ अभिनेता होता काजोलची पहिली पसंती, त्याच्याशी लग्न करण्यासाठी काजोलने..पण अजय देवगणमुळे..

अजय देवगण नाही तर ‘हा’ अभिनेता होता काजोलची पहिली पसंती, त्याच्याशी लग्न करण्यासाठी काजोलने..पण अजय देवगणमुळे..

बॉलिवूडमध्ये अश्या काही जोड्या आहेत की, ज्यांचा आदर्श अनेक जण घेत असतात. यामध्ये काजोल आणि अजय देवगन यांची जोडी देखील अशीच आहे. ही जोडी जवळपास पंचवीस वर्षापासून एकत्र राहत आहे. या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या वर्षी आलेला ‘तानाजी द अनसंग वॉरियर’ हा त्यांचा चित्रपट प्रचंड चालला होता.

गेल्या वर्षभरात केवळ एक चित्रपट आला होता. या चित्रपटाने को’ट्यवधी रु’पयांचा व्य’वसाय केला होता. अजय देवगण आणि काजोल यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. हलचल, होगी प्यार की जीत, इश्क यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपट अजराम’र केले आहेत.

अजय देवगन याने त्याच्या करिअरची सुरुवात फुल और काटे या चित्रपटातून केली होती. हा चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला तुफान यश मिळाले होते. तर काजोल हिने याच सुमारास बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काजोल हिने 1992 मध्ये बेखुदी या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

त्यानंतर तिने ये दिल्लगी, बाजीगर यासारखे हे चित्रपट केले. त्यानंतर तिची अजय देवगन सोबत ओळख झाली. त्यानंतर 1999 मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या जोडीला दोन मुले आहेत. तसेच अजय देवगन बॉलिवूडवर गेल्या तीस वर्षापासून अधिराज्य गाजवत आहे.

दरम्यान, एका वेगळ्या कारणामुळे काजल चर्चेत आली आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन काजोलने अजय देवगणसोबत लग्न केले असले तरी आज मात्र तिला तिच्या निर्णयाचा अभिमान आहे. काजोल आणि अजय देवगणच्या लग्नाला २३ वर्षे झाली आहेत. लग्नानतंर काजोलने सिनेसृष्टीतून ब्रेक घेत कौटुंबिक आयुष्याला जास्त महत्त्व दिले.

पण काजोलची पहिली पसंती अजय देवगण नव्हे तर दुसरंच कोणीतरी होते. आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून काजोलला ओळखले जाते. तिचे लाखो चाहते आहेत. काजोलने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोल चांगली ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले.

त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. पण सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात काजोलला एक अभिनेता प्रचंड आवडत होता. त्याची एक झलक पाहण्यासाठी ती फार आतुर व्हायची. इतकंच नव्हे तर त्या अभिनेत्यामुळेच तिची आणि करण जोहरची ओळख झाली. ते दोघेही एकत्र पार्टीमध्ये त्याला शोधायचे. नुकतंच करण जोहरने याबाबतचा खुलासा केला आहे.

करण जोहरने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये याबद्दलचा गौप्यस्फोट केला होता. करण जोहरने दिलेल्या माहितीनुसार, “लाखो चाहते असणाऱ्या काजोल मात्र बॉलिवूडच्या खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारवर फिदा झाली होती. काजोलचे सिनेसृष्टीत फार कमी मित्र आहे. तिचे मोजून पाच ते सात मित्र असतील.

जेव्हा मी काजोलला पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती माझ्यावर खूप हसली होती आणि त्यानंतर मी तिथून निघून गेलो होतो.” यापुढे तो म्हणाला, “१९९१ मध्ये मुंबईत हिना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ऋषी कपूर आणि जेबा बख्तियार झळकले होते. या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी काजोल ही अक्षयची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होती.

तर दुसरीकडे मी त्याला शोधण्यात तिची मदत करत होतो. आम्ही दोघेही मिळून अक्षय कुमारला शोधत होतो. यावेळी त्या दोघांनाही तो तिथे दिसला नाही. पण यानंतर त्या दोघांची घट्ट मैत्री झाली होती, जी आजतागायत कायम आहे.” दरम्यान त्यानंतर १९९५ मध्ये ‘हलचल’ चित्रपटाच्या दरम्यान अजय आणि काजोलची पहिली भेट झाली होती. अजय आणि काजोलने चार वर्ष एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.